Petrol Diesel Price in 22 December 2022: जागतिक बाजारात गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत आहे. या आठवड्यात प्रथमच ब्रेंट क्रूडची किंमत 80 डॉलरच्या वर गेली आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. आजही तेल कंपन्यांनी दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये तेलाच्या दरांत वाढ केलेली नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारातील दर लक्षात घेऊन भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol-Diesel Price Today ) अपडेट करतात. राज्य सरकार त्यानुसार इंधनाच्या किमतीवर व्हॅट लावतात, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ची अधिकृत वेबसाईट iocl.com च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत आज (गुरुवारी) एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपयांवर स्थिर आहे.
Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर?
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
- परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
- नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
दररोज सकाळी 6 वाजता जाहीर होतात नवे दर
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
झटपट चेक करा तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे नवे दर
तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाईप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.