India Covid-19 Update : भारतात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येत सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच देशात गेल्या 24 तासांत 5 हजारांहून कमी नव्या कोरोना (Covid-19) रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल दिवसभरात एकूण 4 हजार 417 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यासोबतच देशात एकूण रुग्णांची संख्या वाढून आता 4 कोटी 44 लाख 66 हजार 862 एवढी झाली आहे. 


देशात कोरोनाच्या (Corona) सक्रिय रुग्णांची संख्या 52 हजार 336 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत देशात 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोविड-19 महामारीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 5 लाख 28 हजार 30 झाली आहे. गेल्या 24 तासांत देशातील 6 हजार 32 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, आतापर्यंत संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 4 कोटी 38 लाख 86 हजार 496 झाली आहे. 


गेल्या 24 तासांतील लसीकरणाची स्थिती 


देशातील लसीकरणाच्या आकडेवारीबाबत बोलायचं झालं तर, गेल्या 24 तासांत देशात 19 लाख 93 हजार 670 लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्यासोबतच भारतात आता लसीकरणाची एकूण संख्या 213 कोटी 72 लाख 68 हजार 615 पर्यंत पोहोचली आहे. 


गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट


6 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत 1 हजार 638 ची घट झाली आहे. तसेच, देशाचा रिकव्हरी रेट 98.69 टक्के आहे. तर मृत्यू दर 1.19 टक्के इतका आहे. महाराष्ट्र (8105403), केरळ (6762566), कर्नाटक (4055230), तामिळनाडू (3571030) आणि आंध्र प्रदेश (2337260) या पाच राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. केरळ (10084), महाराष्ट्र (8162), तामिळनाडू (4990), कर्नाटक (4872) आणि आसाम (2819) ही सर्वाधिक रुग्ण असलेली राज्य आहेत. तर, कोविड-19 मुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र (148267), केरळ (70859), कर्नाटक (40249), तामिळनाडू (38036) आणि दिल्ली (26481) आहेत.


सोमवारी राज्यात 549 नव्या कोरोना रुग्णांची नोंद


सोमवारी राज्यात 549 नव्या कोरोना (Corona) रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वात जास्त म्हणजे मुंबईत 173 रूग्णांची नोंद झाली आहे. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे, कालच्या तुलनेत आज राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. रविवारी राज्यात 1205 रूग्णांची नोंद झाली होती. रूग्ण संख्येच घट होत असल्यानं ही दिलासादायक बाब आहे. संपूर्ण देशभर कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे.