India COVID-19 Cases : देशात कोरोनाचा वेग वाढतोय; गेल्या 24 तासांत 8 हजारांहून अधिक रुग्ण
India COVID-19 Cases : भारतात कोरोनाचा वेग सातत्याने वाढत आहे. आता गेल्या 24 तासांची आकडेवारी सरकारने जाहीर केली
India COVID-19 Cases : भारतात कोरोनाचा वेग सातत्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज 8 हजारांहून अधिक कोरोनाची वाढती रुग्णसंख्या समोर येत आहे. आता गेल्या 24 तासांची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली असून, त्यातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8822 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनंतर, भारतात एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या 53,637 वर पोहोचली आहे.
लसीकरणही वेगाने सुरू
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत 5,718 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नवीन कोरोना प्रकरणांनंतर, कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4,32,45,517 वर पोहोचली आहे, तर एकूण बरे झालेल्यांची संख्या 4,26,67,088 आहे. कोरोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या 5,24,792 वर पोहोचली आहे. देशात लसीकरणही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत एकूण 1,95,50,87,271 लसीकरण करण्यात आले आहे.
कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ
महाराष्ट्रात राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मंगळवारी राज्यात 2956 रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 1724 रुग्ण हे मुंबईतील आहे आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.
मुंबईकरांची चिंता वाढली
काल राज्यात 2956 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 2165 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत मंगळवारी 1724 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच राज्यात काल कोरोनाच्या चार मृत्यूची नोंद झाली आहे.
कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट
गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6594 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट दिसून आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी दिवसभरात 6594 रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासांत 4035 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 50 हजार 548 पर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी दैनंदिन सकारात्मकता दर मागील दिवसाच्या तुलनेत 2.05 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.