एक्स्प्लोर

India Coronavirus Updates : देशाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार कायम, 24 तासांत 38 हजार नव्या कोरोनाबाधितांची भर

India Coronavirus Updates : गेल्या 24 तासांत 37,875 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच एका दिवसापूर्वी 31,222 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

India Coronavirus Updates : देश तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभा आहे. देशासह राज्यातही तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावतंय. अशातच देशातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत उतार-चढाव दिसत आहेत. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 37,875 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच एका दिवसापूर्वी 31,222 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या 24 तासांत 369 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे,  39,114 रुग्ण काल दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत. 

केरळात सर्वाधिक रुग्णांची नोंद 

केरळात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या 30 हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात येत होती. परंतु, मंगळवारी 25,772 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर 189 रुग्णांचा मृत्यू झाला होता. राज्यात आतापर्यंत एकूण 42 लाख 53 हजार 298 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मृतांचा आकडा 21,820 वर पोहोचला आहे. 

भारतातील कोरोनाची एकूण आकडेवारी

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 30 लाख 96 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 41 हजार 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाबा म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 22 लाख 64 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 91 हजार 256 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. 

देशातील कोरोनाची सद्यस्थिती : 

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 30 लाख 96 हजार 718
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 22 लाख 64 हजार 51
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 91 हजार 256
एकूण मृत्यू : चार लाख 41 हजार 411
एकूण लसीकरण : 70 कोटी 75 लाख 43 हजार लसीचे डोस 

राज्यात काल (मंगळवारी) 3, 898 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 86 रुग्णांचा मृत्यू

राज्यात काल (मंगळवारी) 3, 898 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 581  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 4 हजार 336  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 08 टक्के आहे. 

राज्यात काल (मंगळवारी) 86 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 47 हजार 926 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,409 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (77), नंदूरबार (2),  धुळे (3), जालना (51), परभणी (60), हिंगोली (18),  नांदेड (28), अमरावती (76), अकोला (16), वाशिम (05),  बुलढाणा (84), यवतमाळ (2), नागपूर (72),  वर्धा (2), भंडारा (1), गोंदिया (5),  गडचिरोली (35) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 51,59,364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,93,698 (11.77 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,06,524 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,021  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत गेल्या 24 तासांत 353 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासांत 353 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 404 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,24,898 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासांत दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3718 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1266 दिवसांवर गेला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget