एक्स्प्लोर

Coronavirus Update : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी? आठ महिन्यांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद

India Coronavirus Updates : गेल्या 24 तासांत 13,058 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 164 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. तर 19,470 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

India Coronavirus Updates : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर मंदावताना दिसत आहे. सलग पाचव्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. आठ महिन्यांनी सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 13,058 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 164 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. तर 19,470 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

देशातील कोरोना संसर्गाची स्थिती 

कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 40 लाख 94 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 52 हजार 454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 34 लाख 58 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांहून कमी झाली आहे. एकूण 1 लाख 83 हजार 118 रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत. 

कोरोनाची एकूण आकडेवारी : 

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 40 लाख 94 हजार 373
एकूण कोरोनामुक्त : तीन कोटी 34 लाख 58 हजार 801
एकूण सक्रिय रुग्णसंख्या : एक लाख 83 हजार 118
एकूण मृत्यू : चार लाख 52 हजार 454
लसीकरणाची एकूण आकडेवारी : 98 कोटी 67 लाख 69 हजार लसीचे डोस 

कोरोनाचा विळखा आणखी सैल, राज्यात आज  1485 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज  1485 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 078 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 21  हजार 756  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के आहे. 
 
राज्यात आज 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 7843  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (10), नंदूरबार (0),  धुळे (3), जालना (69), परभणी (28), हिंगोली (22), नांदेड (18),  अकोला (25), अमरावती (10),  वाशिम (07), अकोला (22), बुलढाणा (16), नागपूर (61), यवतमाळ (08),  वर्धा (4), भंडारा (1), गोंदिया (3),   गडचिरोली (5 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

राज्यात सध्या 28 हजार 008 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,08,613व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 961  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2, 08, 613 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 

मुंबईत गेल्या 24 तासात 373 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 373 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 543 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,27,627 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5183 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1253दिवसांवर गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Sanjay Shirsat: मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांचा साचलेला संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांचा साचलेला संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवासांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवासांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Sanjay Shirsat: मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
Uddhav Thackeray: मुंबईच्या तिरंगा मोर्चातील उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण, मोदींपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं, म्हणाले, 'ही ठिणगी विझून देऊ नका'
मुंबईच्या तिरंगा मोर्चातील उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण, मोदींपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं, म्हणाले, 'ही ठिणगी विझून देऊ नका'
Embed widget