एक्स्प्लोर

India Coronavirus Updates : देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची धास्ती; 6 दिवसांनी 35 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधित

India Coronavirus Updates : काल दिवसभरात जगभरात इराणनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद भारतात करण्यात आली आहे. अमेरिकेत भारताहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.

India Coronavirus Updates : भारतात कोरोना प्रादुर्भावात काहीशी घट झाली आहे. पण अद्यापही धोका कायम आहे. सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनं देशात सर्वांची धास्ती वाढवली आहे. अशातच तज्ज्ञांकडून देशात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 32,937 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 417 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 9 ऑगस्ट रोजी 28,204 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देशात गेल्या 24 तासांत 35,909 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 

कोरोनाची एकूण आकडेवारी 

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 22 लाख 25 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 31 हजार 642 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 11 हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात सध्या कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 81 हजार रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहे. 

देशातील सध्याची कोरोनास्थिती

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 22 लाख 25 हजार 513
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 14 लाख 11 हजार 924
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 81 हजार 947
एकूण मृत्यू : चार लाख 31 हजार 642
लसीकरणाची एकूण आकडेवारी : 53 कोटी 57 लाख 57 हजार लसींचे डोस

राज्यात काल (रविवारी) 4797 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात काल (रविवारी) 4 हजार 797 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 हजार 710 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 89 हजार 933 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.83 टक्के आहे. 

राज्यात काल (रविवारी) 130 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. एकूण 37 जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात आज एकाही मृत्यूची नोंद नाही. धुळे, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या पाच जिह्यांमध्ये आज एक कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 09,59,730 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,92,660 (12.54 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,59,642 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,453 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

राज्यात सध्या 64 हजार 219 रुग्णावर उपचार सुरु आहेत. सर्वाधित 14 हजार 748 अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. तर नंदूरबार- 1, धुळे- 4, परभणी - 43, हिंगोली - 88, नांदेड- 49, अमरावती 53, अकोला- 33, वाशिम - 19, बुलडाणा - 30, यवतमाळ- 16, वर्धा- 7, भंडारा- 1, गोंदिया- 1, चंद्रपूर- 99, गडचिरोली- 30 या जिल्ह्यामध्ये अक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. 

मुंबईत गेल्या 24 तासात 267 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 267 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 308 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,083 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,834 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1921 दिवसांवर गेला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget