एक्स्प्लोर

Coronavirus Update : देशात सलग पाचव्या दिवशी दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये घट, मृतांच्या आकड्यात मात्र वाढ

India Coronavirus Updates : गेल्या 24 तासांत 25,404 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच गेल्या 24 तासांत 339 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

India Coronavirus Updates : भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी घट झाल्याचं पाहायला मिळालं. 9 सप्टेंबरपासून देशात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार,  गेल्या 24 तासांत 25,404 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच गेल्या 24 तासांत 339 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 37,127 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

केरळमधील कोरोना प्रादुर्भावातही घट 

केरळातील कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. केरळात सोमवारी कोरोनाच्या 15,058 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ज्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढून 43 लाख 90 हजार 489 झाली आहे. तसेच कोरोनामुळे आणखी 99 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत केरळात कोरोनामुळं 22,650 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

भारतातील सध्याची कोरोनास्थिती 

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 32 लाख 89 हजार रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 43 हजार 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 24 लाख 84 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 62 हजार 207 रुग्णांना अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत. 

कोरोनाची एकूण आकडेवारी :

कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 32 लाख 89 हजार 579
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 24 लाख 84 हजार 159
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 62 हजार 207
एकूण मृत्यू : चार लाख 43 हजार 213
एकूण लसीकरण : 75 कोटी 22 लाख 38 हजार लसीचे डोस 

राज्यात काल (मंगळवारी)  2740 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3233  रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात काल (मंगळवारी)  2740 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 233  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 09 हजार 021  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 05 टक्के आहे. 

राज्यात काल (मंगळवारी) 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 49 हजार 880 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,102 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (5), नंदूरबार (3),  धुळे (1), जालना (36), परभणी (50), हिंगोली (16),  नांदेड (23), अमरावती (97), अकोला (28), वाशिम (1),  यवतमाळ (9), वर्धा (4), भंडारा (1), गोंदिया (5), चंद्रपूर (50), गडचिरोली (15) या 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 60,88,114 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,00,617 (11.59 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,99,192 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,883  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
Mohan Bhagwat On LGBTQ Marriage : समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget