एक्स्प्लोर

Corona Cases : देशाच्या दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा वाढ; 24 तासांत 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

Corona Cases : देशात गेल्या 24 तासांत 42,015 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3998 रुग्णांचा मृत्यूआतापर्यंत देशात 3 कोटी 3 लाख 90 हजार रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त

Coronavirus Today : देशात काल दिवसभरात 125 दिवसांनी कोरोना व्हायरसच्या सर्वात कमी 30 हजार 93 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. परंतु, बुधवारी पुन्हा एकदा 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 42,015 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3998 बाधितांनी जीव गमावला आहे. गेल्या 24 तासांत 36,977 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

देशातील सध्याची कोरोना स्थिती 

देशात एकूण सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 7 हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास तीन कोटी 12 लाख 16 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 18 हजार 480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 3 लाख 90 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

41 कोटींहून अधिक लसींचे डोस नागरिकांना दिले गेले 

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 20 जुलैपर्यंत देशभरात 40 कोटी 54 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 34 लाख 25 हजार लसीचे डोस देण्यात आले. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 44 कोटी 91 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 18.52 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्या आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून कमी आहे. 

देशातील 68 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज, 40 कोटी लोकांना कोरोनाचा धोका कायम

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका समोर असताना सेरो सर्वेमध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात सामील झालेल्या 67.6 टक्के लोकांमध्ये  कोविड अॅन्टीबॉडीज आढळल्या आहेत. तर जवळपास निम्या लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) मंगळवारी चौथ्या सेरो सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली. हे सर्वेक्षण जून-जुलै दरम्यान करण्यात आले होते. 28,975 लोकांवर केलेल्या या सर्वेक्षणात 6 ते 17 वयोगटातील मुलांचा देखील समावेश होता. या सर्वेक्षणात सामील झालेल्या 67.6 टक्के लोकांमध्ये  कोविड अॅन्टीबॉडीज आढळल्या आहेत. म्हणजेच 67.6 टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यामुळे लोकसंख्येचा विचार केला तर अजूनही 40 कोटी लोकांमध्ये अद्यापही अँटीबॉडीज तयार झालेल्या नाहीत. म्हणजे या 40 कोटी नागरिकांना कोरोनाचा धोका कायम आहे.

राज्यात काल  6, 910 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काल 6, 910  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 510 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 911 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे. 

राज्यात काल (मंगळवारी) 147 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 41 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  94, हजार 593 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (29), हिंगोली (41), यवतमाळ (15), गोंदिया (57) या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 042 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

मालेगाव, हिंगोली, अकोला, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर  आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 685 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,58,46,165 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,29, 596 (13.59 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,60,354 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,977 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sero Survey India : देशातील 68 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज, 40 कोटी लोकांना कोरोनाचा धोका कायम

महत्त्वाच्या बातम्या

Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Embed widget