एक्स्प्लोर

India Corona Update : देशात 203 दिवसांनी सक्रिय रुग्णसंख्येत घट, गेल्या 24 तासांत 18,833 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

India Corona Update : गेल्या 24 तासांत 18,833 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 278 कोरोना रुग्णांचा मृत्यू, तर 24770 रुग्ण कोरोनामुक्त.

India Corona Update : देशातील कोरोना प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तरी धोका अद्याप टळलेला नाही. सध्याच्या देशातील सक्रिय रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण केरळातील आहेत. आरोग्य मंत्रालयानं बुधवारी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 18,833 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 278 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 24 तासांत 24770 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, देशातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या अडिच लाखांहून कमी झाली आहे. देशात सध्या 2,46,687 रुग्ण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ही 203 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. यापूर्वी मंगळवारी कोरोनाच्या 18 हजार 346 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 201 दिवसांनी मंगळवारी नव्या कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारांनी कमी आली. जाणून घेऊया देशातील कोरोनाची सद्यस्थिती... 

आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल (मंगळवारी) 4 हजार 770 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन 2 लाख 46 हजार 687 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनाच्या तीन कोटी 38 लाख 71 हजार 881 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 49 हजार 538 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 31 लाख 75 हजार 665 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

राज्यात काल (मंगळवारी) 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल (मंगळवारी)  2, 401 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 840  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 88  हजार 899  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. 
 
राज्यात काल (मंगळवारी) 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 593  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (18), नंदूरबार (1),  धुळे (3), जालना (44), परभणी (80), हिंगोली (15), नांदेड (08),  अकोला (22), वाशिम (08), बुलढाणा (25), यवतमाळ (09),   वर्धा (8), भंडारा (2), गोंदिया (1),   गडचिरोली (16 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

राज्यात सध्या 33 हजार 159 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,40,052 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,338  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 94, 69, 053  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,64, 915 (11.04टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 

मुंबईत गेल्या 24 तासात 433 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 433 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 525 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,096 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4438 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1154 दिवसांवर गेला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Mirabai Chanu Weightlifting Gold Medal: मीराबाई चानूची सोनेरी कामगिरी...राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, चार पदकांसह भारत गुणतालिकेत आठव्या स्थानी
मीराबाई चानूची सोनेरी कामगिरी...राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, चार पदकांसह भारत गुणतालिकेत आठव्या स्थानी
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
Exam Reforms Task Force : पेपरफुटी रोखण्यासाठी आता 'आधार' कार्डचे जनक मैदानात, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, हाय-पावर टास्क फोर्सची स्थापना
पेपरफुटी रोखण्यासाठी आता 'आधार' कार्डचे जनक मैदानात, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, हाय-पावर टास्क फोर्सची स्थापना

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget