एक्स्प्लोर

मोदींशी न बोलताच ट्रम्प यांना चीनबद्दल भारताचा मूड कळाला? मध्यस्थीसाठी अमेरिकेचा उतावळेपणा

भारत आणि चीनमधला तणाव सध्या वाढलेला आहे. पण या सगळ्या प्रकरणात अमेरिका मात्र नाहक मध्यस्थीसाठी उतावळी झालीय.आधी काश्मीर प्रश्न आणि भारत- चीन संबंध. प्रत्येक ठिकाणी मध्यस्थीची घाई अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना झालीय. यावेळी तर त्यांनी हद्दच केलीय.

नवी दिल्ली : लडाख सीमेवर लष्कराच्या तैनातीवरुन भारत आणि चीनमधला तणाव सध्या वाढलेला आहे. पण या सगळ्या प्रकरणात अमेरिका मात्र नाहक मध्यस्थीसाठी उतावळी झालीय. गेल्या दोन दिवसांपासून ट्रम्प यांची याबाबत वक्तव्य सुरुच होती. आता तर ते खोटं बोलून याबाबत भारताची मतं सांगू लागलेत. आधी काश्मीर प्रश्न आणि भारत- चीन संबंध. प्रत्येक ठिकाणी मध्यस्थीची घाई अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना झालीय. यावेळी तर त्यांनी हद्दच केलीय. मोदींशी बातचीत न होताच त्यांच्या मनात काय चाललंय हे त्यांनी जाहीर करुन टाकलं. भारत आणि चीनमध्ये जो तणाव वाढला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? असा प्रश्न विचारल्यावर ट्रम्प यांनी 'मी मोदींशी बोललो, ते काही चीनवरुन चांगल्या मूडमध्ये दिसत नाहीत' असं सांगून टाकलं. मोदींचा मूड नेमका कसा आहे हे जाणून घ्यायला ट्रम्प महाशयांची मोदींसोबत चर्चा तरी व्हायला हवी होती. पण भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय की या दोन नेत्यांमध्ये अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात शेवटचा संवाद 4 एप्रिल रोजी झाला.जेव्हा अमेरिकेला हव्या असलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनसंदर्भातली चर्चा सुरु होती. त्यानंतर त्यांच्यात कुठलाही फोनवरुन संवाद नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. साहजिकच ट्रम्प यांच्या मध्यस्थीसाठी भारत काही अमेरिकेच्या दारात गेलेला नाही हे ठासून सांगण्यासाठीच सरकारनं हे तातडीनं स्पष्ट केलं. दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारत चीन तणावात अमेरिका मध्यस्थी करायला उत्सुक असल्याचं आणि तसं आपण दोन देशांना कळवलं असल्याचंही वक्तव्य केलं होतं. लडाखमधल्या सैन्य तैनातीवरुन भारत आणि चीनमधला संघर्ष 6 मे पासून वाढलेला आहे. जवळपास 10 हजार सैनिक एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. नेपाळलाही चीन भारताच्या विरोधात चिथावत असल्याचं दिसतंय. पण ही सगळी परिस्थिती हाताळताना भारतानं जे अधिकृत वक्तव्य केलं त्यात धोरणात्मक कणखरता दाखवली होती. भारत चीन सीमेवर लाईन ऑफ कंट्रोलमध्ये कुठलाही बदल भारत स्वीकारणार नाही. दोन्ही देशांमध्ये प्रशासनिक, लष्करी पातळीवरचा संपर्क कायम आहे. दोन्ही देशांनी याबाबत अनेकदा वेगवेगळे करारही केले आहेत.  कोरोनाशी युद्ध चालू असताना चीनसोबत वाढलेला तणाव ही देखील भारतासाठी चिंतेची बाब आहे. पण कुठल्याही पद्धतीनं यात दुसऱ्या देशाची मध्यस्थी भारताला नको आहे. काश्मीर प्रश्नावरुनही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अशीच मध्यस्थीची विनंती केली होती. पाकिस्तानसोबत एक विधान, भारतासोबत दुसरंच विधान असेही प्रकार त्यांनी केले आहेत. आता तर चक्क न झालेल्या संभाषणावरुनच भारताचं काय मत आहे हे ते सांगत असतील तर कठीण आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेचा अध्यक्ष बिनदिक्कत खोटं बोलतोय की काय असाही सवाल त्यामुळे उपस्थित होतो.

महत्त्वाच्या बातम्या

Omraje Nimbalkar: ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
Shivsena case in Supreme Court: गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहांना चिठ्ठी पाठवली आहे...' मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहांना चिठ्ठी पाठवली आहे...' मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
Operation Tiger UBT Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!
मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!

व्हिडीओ

Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War LIve Update: 'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
Omraje Nimbalkar: ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या
मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या
Anjali Damania: 'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
Kolhapur News: 'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
Embed widget