नवी दिल्ली : चीन सोबतच्या तणावानंतर चीनने भारतीय भूभागावर अतिक्रमण केल्याचं बोललं जात होतं. मात्र चीनने भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केलं नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच म्हटलं होतं. आता सॅटलाईट फोटोंवरून देखील हे स्पष्ट होत आहे. भारताच्या जमिनीवर चीनकडून कोणत्याही प्रकारची घुसखोरी झाली नसल्याचं दिसून येत आहे.


चीनी सैन्याने एलएसीच्या पलिकडे बफर झोनमध्ये भारतासोबत धोकेबाजी केली. चीनी सैन्याच्या हल्ल्याला भारतीय सैनिकांनीही जशास तसं उत्तर दिलं. मात्र एलएसीच्या पलिकडे भारताच्या हद्दीत चीनी सैन्य कधीही आलं नाही. गलवान खोऱ्यातील भारताचा भूभाग सुरक्षित आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, सॅटेलाईटवरून जे फोटो मिळाले आहेत ते 6 मे पासून ते 18 जूनपर्यंतचे आहेत. प्रत्येक फोटोतून दिसून येत आहे की चीनने कशाप्रकारे संपूर्ण कट रचला. चीनने गलवान नदीचं पाणी रोखून ठेवलं. त्यानंतर त्याच्या प्रवाहाची दिशा बदलली. त्यानंतर नदी कोरडी झाल्यानंतर नदीच्या खोऱ्याचा वापर करत चीनी सैन्य एलएसीच्या जवळ आलं. एलएसीच्या जवळ चीनी सैन्यानं आपले तंबू उभारले. अशारीतीने चीनी सैन्याने भारतासोबत झालेल्या कराराचं उल्लंघन केलं.



चीन आणि भारतात झालेल्या करारानुसार, एलएसीच्या जवळ सैन्य जमवायचं नाही आणि कोणत्याही प्रकारचं बांधकाम उभारायचं नाही. या कराराचं चीनने उल्लंघन केलंय. तंबू उभारल्यानंतर चीनने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जमा केला. नियमांचं उल्लंघन करत चीनने अक्साई चीन म्हणजे ज्या भारताच्या भू भागावर चीनने अवैधरित्या अतिक्रमन केलं आहे, तिथे हालचाली सुरु केल्या. चीनला विरोध करण्यासाठी आणि तंबू काढण्यासाठी भारतीय सैनिक 14 जूनच्या रात्री तिथे गेले होते. मात्र आधीच तयारीत असलेल्या चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले.


संबंधित बातम्या




C Voter Survey | भारत-चीन वादावर सर्वात मोठा पोल, सी व्होटरचं सर्वेक्षण, पाहा सर्व्हे!