नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरच्या घटनेबाबत आज एक नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनसोबतच्या झटापटीनंतर चीनचेही सैनिक आपले ताब्यात होते, ज्यांना नंतर आपण सोडून दिले, अशी माहिती माजी लष्कर प्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही के सिंह यांनी दिली आहे. दरम्यान, दोन्ही देशांनी आपापले जवान ऐकमेकांना सुपूर्द केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, सरकारकडून अद्याप कोणतंही वक्तव्य आलेलं नाही.
यापूर्वीचं अनेक इंग्रजी वृत्तपत्रांनी चीनने भारताच्या 10 जवानांना बंदी बनवले होते. नंतर त्यांना सोडले. मात्र, दोन्ही देशाकडून या बातमीचं खंडन करण्यात आलं होतं. मात्र, आता पहिल्यांदाचं केंद्रातील मंत्र्यांनी सैनिकांबद्दल कबुली दिली आहे. माजी लष्कर प्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही के सिंह म्हणाले, त्या रात्री गलवान खोरीत नदीच्या किनारी जवळपास सहाशे लोकांचा जमाव अचानक अंधारात एकमेकांना भिडले. यावेळी अनेक सैनिक ऐकमेकांच्या बाजूला गेले. चीनने आपल्या काही सैनिकांना बंदी बनवले होते. तसेच चीनचे काही सैनिक आपल्या ताब्यात होते. मात्र, हे सैनिक ऐकमेकांना सुपूर्द करण्यात आले आहे.
सर्वात आधी द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रानं या घटनेशी संबंधित लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं ही बातमी दिली. पण सरकारनं त्याबाबत अजून कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीय. भारताचे 10 जवान चीनच्या तावडीत होते की नव्हते? या 10 जवानांची काल सुटका झाल्याच्या बातम्यांवर सरकारचं अद्याप काहीच स्पष्टीकरण का नाही? नेमकं सत्य काय आहे हे का सांगितलं जात नाहीय?, असे प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत. मात्र, या बातमीचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने खंडन केलं आहे. आमच्या ताब्यात भारतीय सैनिक नसल्याचं चीनने म्हटलं आहे.
India China Face Off | नरेंद्र मोदी खरंतर सरेंडर मोदी!; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
सरकारकडून घटनेवर मौन
15-16 जूनच्या मध्यरात्री सीमेवर हिंसक झटापट झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं नेमकं काय झालं याची माहिती बाहेर येतेय. 20 जवान तर शहीद झाले, पण काही जवान बेपत्ता असल्याच्याही बातम्या होत्या. त्याबाबत सरकारनं कुठलं वक्तव्य केलं नव्हतं. काल संध्याकाळी जेव्हा या जवानांना सुखरुप परत आणण्यात यश आलं, त्यानंतर आर्मीनं फक्त एक त्रोटक वक्तव्य जाहीर केलं की कुठलंही भारतीय पथक बेपत्ता नाहीय. या त्रोटक वक्तव्यातून काहीच स्पष्ट होत नाही. काही बड्या लष्करी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जेव्हा या सर्व जवानांची सुटका झाली, त्यानंतरच हे स्टेटमेंट लष्करानं केलं असावं. हे 10 जवान परत येणं ही भारतासाठी प्रतिष्ठेची बाब होती, त्यामुळेच चर्चेच्या, प्रतिक्रियेच्या पातळीवर गेले चार दिवस सावधानता बाळगली जात असावी.
आपण चीनच्या काही सैनिकांना बंदी बनवलं आणि नंतर सोडलं, मंत्री व्ही.के.सिंहांचा दावा