नवी दिल्ली : भारतात जीवघेणा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. देशात आता कोरोना बाधितांची संख्या चार लाखांच्या पार पोहोचला आहे. देशात आता कोरोना बाधितांची संख्या चार लाखांच्या पार पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत भारतात 306 लोकांचा मृत्यू आणि 15413 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे.


आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारता पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आतापर्यंत 4,10,461 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये 1,69,451 अॅक्टिव्ह रुग्ण, तर 2,27,756 रुग्ण ठिक झाले आहेत. तसेच जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे 13254 लोकांचा मृत्यू झाला आहे.


एक जून ते 20 मध्ये दोन लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू


गेल्या एक जूनपासून 20 जूनमध्ये देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे दोन लाखांहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये कोविड-19 रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे.


कोरोना बाधितांच्या संख्येत जगात चौथ्या क्रमांकावर भारत


ब्राझील, रशिया, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित आहेत. चार देश (अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.21 लाखांहून अधिक झाला आहे. चीन टॉप-18 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला असून भारताचा समावेश कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या टॉप-4 देशांमध्ये झाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Solar Eclipse 2020: शतकातील दुसरं सर्वात दुर्मिळ सूर्यग्रहण आज, जाणून घ्या कसं असेल हे सूर्यग्रहण


कोरोनाला हरवायचंय तर योगा आवश्यक, प्राणायमाला दैनंदिन आयुष्याचा भाग बनवा : पंतप्रधान मोदी


सावधान! भारतावर चीन सायबर हल्ला करण्याची शक्यता! अनोळखी ईमेल उघडू नका