Tomato Price Drop: स्वातंत्र्य दिनाचं गिफ्ट! आजपासून टोमॅटो 50 रुपये किलोनं विकण्याची सरकारची घोषणा
Independence Day PM Modi Live Updates : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचंच नव्हे तर जगाचे लक्ष लागलं आहे. वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
LIVE
Background
Independence Day 2023 Live : आज देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. तर, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण केले जाणार आहे. लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. लाल किल्यावर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सकाळी 6.55 मिनीटांनी सुरू होणार आहे. 7.33 वाजता पंतप्रधान मोदींच भाषण होईल. सकाळी 7.30 वाजता पंतप्रधान मोदी ध्वाजारोहण करतील आणि त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. त्यानंतर 7.33 वाजता पंतप्रधान मोदींचे देशाला उद्देशून भाषण होईल.
यावर्षी महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक संघटना योजनेच्या 24 लाभार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या समारोहाला आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरुन केलेले भाषण ऐकण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 1 हजार 800 व्यक्तींमध्ये या योजनेच्या अडीचशे लाभार्थ्यांचा त्यांच्या जोडीदारासह समावेश आहे. या विशेष निमंत्रितांमध्ये व्हायब्रंट व्हिलेजेसचे सरपंच, शिक्षक, शेतकरी,मच्छिमार तसेच सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्प, अमृत सरोवर, हर घर जल या आणि अशाच इतर महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील ध्वजारोहण करणार आहेत. ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्री राज्याला उद्देशून भाषण करतील. यामध्ये राज्याच्या प्रगतीच्या सध्याचे स्थितीवरती ते भाष्य करतील. स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवसेना भवन येथे सकाळी 8 वाजता ध्वजारोहण होणार आहे.
सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारती, तसेच अंगणवाड्या, शाळा, रुग्णालये यासह सर्व शासकीय संस्थांवर राष्ट्रीय ध्वज संहितेनुसार फक्त दिवसा ध्वज फडकवावा. म्हणजेच शासकीय कार्यालये आणि संस्थांना रात्री तिरंगा फडकविण्यास परवानगी नाही.'घरोघरी तिरंगा' अभियानात मुंबईकरांनी गत वर्षी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे या वर्षी देखील मुंबईकरांनी या अभियानात सहभागी व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.
देशभरात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' गेल्या वर्षभरापासून साजरा करण्यात येतोय. आता हा महोत्सव समारोपाकडे वाटचाल करीत आहे. हे अभियान 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबविले जाणार आहे. या निमित्ताने 'मेरी माटी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश' या अभियानाने अमृत महोत्सवाची सांगता होत आहे. या अभियानात शिलाफलकम, पंच प्रण (शपथ), वसुधा वंदन, वीरांना वंदन, ध्वजवंदन, मिट्टी यात्रा असे उपक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत.
Mumbai : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टोरी शेअर केल्याने दोन तरुणांना कुलाबा पोलिसांकडून अटक
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टेटस स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिसांनी 19 वर्षीय दोन तरुणांना अटक केली आहे. 14 ऑगस्ट रोजी कुलाबा मार्केटमधील एका व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दिली होती. कुलाबा मार्केटमधील काही लोकांनी इंस्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाची स्टेटस स्टोरी पोस्ट केल्याची तक्रार होती. त्यानंतर कुलाबा पोलिस ठाण्याच्या पथकाने कुलाबा मार्केटमध्ये जाऊन दोघांना ताब्यात घेतले.
Tomato Price Drop: स्वातंत्र्य दिनाचं गिफ्ट! आजपासून टोमॅटो 50 रुपये किलोनं विकण्याची सरकारची घोषणा
Independence Day: स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत थार रॅलीचं आयोजन, 50 हून अधिक थार रॅलीमध्ये सहभागी
Independence Day: स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्तानं मुंबईत एका विशेष थार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. 'टरेन कॉन्कर्स' या मुंबईतील हौशी थारप्रेमींनी या रैलीचं आयोजन केलं होतं. मानखुर्दजवळ मुंबच्या प्रवेशद्वारावरून निघालेल्या या रैलीत 50 हून अधिक थार सहभागी झाल्या होत्या.