भारत : भारत (India) यंदा आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. संपूर्ण देशभरात आजच्या दिवशी उत्साहाचं वातावरण आहे. ब्रिटांशांच्या तावडीतून आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताने विकासाच्या दिशेने पावलं उचचली. त्याचप्रमाणे भारताने त्यानंतर अनेक विकासाची शिखरं सर देखील केली. भारताने सांस्कृतिक वारसा जपत औद्योगिक क्षेत्रात देखील कमालीची झेप घेतली आहे. त्याच भारतीय संस्कतीचे दर्शन गुगलने (Google) त्यांच्या डूडलमध्ये (Doodle) झालं आहे. गुगलने त्यांच्या डूडलच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या (Independance day) शुभेच्छा दिल्या आहे. गुगलने त्यांच्या या डूडलमध्ये भारताची वस्त्र समृद्धी दाखवली आहे. 


भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त खास डूडल


भारताने स्वातंत्र्याची 76 वर्षे पूर्ण केली असून यंदा भारत आपला 77वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. 'राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम' ही यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम आहे. आपण सर्व भारतीयांनी मिळून राष्ट्राची प्रगती साधण्याचा हेतू या थीमच्या माध्यमातून ठेवण्यात आला आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गुगलने देशातील ल समृद्ध आणि वैविध्यपूर्ण परंपरा दर्शन घडवलं आहे. गुगलकडून डूडलच्या माध्यमातून देशातील देशातील समृद्ध वस्त्रोद्योग वारसा दाखवण्यात आला आहे. तसेच या डूडलमध्ये  फॅब्रिक, प्रिंट आणि हँडलूम अशा माध्यमातून भारतीय वस्त्रोद्योग अनेक प्रकारे दाखवण्यात आले आहेत. 


नवी दिल्ली येथील गेस्ट आर्टिस्ट नर्मता कुमार यांनी हे डुडल तयार केले आहे. गुगल डूडलने भारताच्या या ऐतिहासिक दिनाचे महत्त्व देखील या माध्यमातून सांगितले आहे. त्यामुळे गुगलच्या या डूडलच्या माध्यमातून संपूर्ण जागामध्ये भारताच्या या सुवर्ण दिवसाची नोंद घेतली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. गुगलच्या या डूडलमुळे भारतातील विविधतेचे देखील दर्शन होत आहे. 


देशांतील विविध साड्यांचं सौंदर्य गुगलच्या डूडलमध्ये


साडी हा भारतीय स्त्रियांचा पारंपारिक पोषाख आहे. देशातील प्रत्येक भागामध्ये साडी ही वेगवेगळ्या पद्धतीने नेसली जाते. पण तीचं सौंदर्य मात्र दे सारखंच असतं.  गुगल डूडलमध्ये देशातील विविध राज्यांमधील साड्यांचं दर्शन घडवण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्राची पैठणी, हिमाचाल प्रदेशची विणलेली पट्टु साडी, पश्चिम बंगालची कांथा आणि विणलेली जामदानी साडी, गोव्याची विणलेली कुनबी साडी, उत्तर प्रदेशातील बनारसी साडी यांसह वेगवेगळ्या राज्यातील साड्या यामध्ये दाखवण्यात आल्या आहेत. 


संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा उत्सव 


संपूर्ण देशभरात आज स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे.  दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करत देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Independence Day 2023: पंतप्रधान मोदींचा रेकॉर्ड; दहा वर्षात लाल किल्ल्यावरून 13 तास 40 मिनिटे भाषण, जाणून घ्या किती वेळ बोलले?