Tomato Price Drop: स्वातंत्र्य दिनाचं गिफ्ट! आजपासून टोमॅटो 50 रुपये किलोनं विकण्याची सरकारची घोषणा
Independence Day PM Modi Live Updates : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचंच नव्हे तर जगाचे लक्ष लागलं आहे. वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टेटस स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिसांनी 19 वर्षीय दोन तरुणांना अटक केली आहे. 14 ऑगस्ट रोजी कुलाबा मार्केटमधील एका व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दिली होती. कुलाबा मार्केटमधील काही लोकांनी इंस्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाची स्टेटस स्टोरी पोस्ट केल्याची तक्रार होती. त्यानंतर कुलाबा पोलिस ठाण्याच्या पथकाने कुलाबा मार्केटमध्ये जाऊन दोघांना ताब्यात घेतले.
Independence Day: स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्तानं मुंबईत एका विशेष थार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. 'टरेन कॉन्कर्स' या मुंबईतील हौशी थारप्रेमींनी या रैलीचं आयोजन केलं होतं. मानखुर्दजवळ मुंबच्या प्रवेशद्वारावरून निघालेल्या या रैलीत 50 हून अधिक थार सहभागी झाल्या होत्या.
Nashik 15 August : स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी व उपस्थित नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जितिन रहेमान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, भीमराज दराडे, डॉ. शशिकांत मंगरूळे, रवींद्र भारदे, सीमा अहिरे, शुभांगी भारदे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, तहसीलदार परमेश्वर कासुळे, अमोल निकम, रचना पवार, मंजुषा घाटगे, वैशाली आव्हाड, विधी अधिकारी हेमंत नागरे, नायब तहसिलदार विजय कच्छवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक तसेच नागरिक उपस्थित होते.
PM Modi Speech Live: देश आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. यावेळी 21 तोफांची सलामी देण्यात आली.
Navi Mumbai Independence Day 2023 Live : आज देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष पूर्ण झाली. प्रत्येक भारतीयासाठी आजचा दिवस हा अभिमानाचा आणि गर्वाचा... देशभरात सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. तसंच प्रत्येक शासकीय इमारतींनाही आकर्षक सजावट करण्यात आलीये. नवी मुंबई महानगर पालिकेलाही विद्युत रोषणाई करण्यात आलीये. ही रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केल्याचं पहायला मिळालं,.
Pandharpur Temple: स्वातंत्र्यदिनानिमित्त विठ्ठल मंदिरावर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आलीय. त्यामुळं परिसर तिरंगी रंगात उजळून निघालाय. तसंच विठुरायाच्या मंदिरात तिरंगी फुलांची सजावट करण्यात आलीय.. दर्शनासाठी आज दिवसभर भाविकांची मंदियाळी पाहायला मिळेल.
RSS Indpendence Day: देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. बंगळुरुमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. सकाळी 7 वाजता बंगळुरुतल्या कन्व्हेशन सेंटर इथं हा सोहळा पार पडला.
Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधींकडून विशेष व्हिडीओ शेअर करत देशवासियांना 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. भारत माता हर एक भारतीय की आवाज है, म्हणत राहुल गांधींकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Independence Day 2023 Live : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर पोहचले. मोदींनी महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली
Independece Day 2023: आज देशाच्या स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण झालीत. या निमित्ताने देशभरात देशभरात जल्लोष सुरू आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्वांचा उत्साह ओसांडून वाहत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं. भारतीय स्वातंत्र्यविरांनी देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केलं. तेव्हापासून १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने देशभरात ध्वजारोहण केलं जातं,
पार्श्वभूमी
Independence Day 2023 Live : आज देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. तर, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण केले जाणार आहे. लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. लाल किल्यावर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सकाळी 6.55 मिनीटांनी सुरू होणार आहे. 7.33 वाजता पंतप्रधान मोदींच भाषण होईल. सकाळी 7.30 वाजता पंतप्रधान मोदी ध्वाजारोहण करतील आणि त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. त्यानंतर 7.33 वाजता पंतप्रधान मोदींचे देशाला उद्देशून भाषण होईल.
यावर्षी महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक संघटना योजनेच्या 24 लाभार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या समारोहाला आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरुन केलेले भाषण ऐकण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 1 हजार 800 व्यक्तींमध्ये या योजनेच्या अडीचशे लाभार्थ्यांचा त्यांच्या जोडीदारासह समावेश आहे. या विशेष निमंत्रितांमध्ये व्हायब्रंट व्हिलेजेसचे सरपंच, शिक्षक, शेतकरी,मच्छिमार तसेच सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्प, अमृत सरोवर, हर घर जल या आणि अशाच इतर महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील ध्वजारोहण करणार आहेत. ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्री राज्याला उद्देशून भाषण करतील. यामध्ये राज्याच्या प्रगतीच्या सध्याचे स्थितीवरती ते भाष्य करतील. स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवसेना भवन येथे सकाळी 8 वाजता ध्वजारोहण होणार आहे.
सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारती, तसेच अंगणवाड्या, शाळा, रुग्णालये यासह सर्व शासकीय संस्थांवर राष्ट्रीय ध्वज संहितेनुसार फक्त दिवसा ध्वज फडकवावा. म्हणजेच शासकीय कार्यालये आणि संस्थांना रात्री तिरंगा फडकविण्यास परवानगी नाही.'घरोघरी तिरंगा' अभियानात मुंबईकरांनी गत वर्षी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे या वर्षी देखील मुंबईकरांनी या अभियानात सहभागी व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.
देशभरात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' गेल्या वर्षभरापासून साजरा करण्यात येतोय. आता हा महोत्सव समारोपाकडे वाटचाल करीत आहे. हे अभियान 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबविले जाणार आहे. या निमित्ताने 'मेरी माटी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश' या अभियानाने अमृत महोत्सवाची सांगता होत आहे. या अभियानात शिलाफलकम, पंच प्रण (शपथ), वसुधा वंदन, वीरांना वंदन, ध्वजवंदन, मिट्टी यात्रा असे उपक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -