India National Anthem : भारताच्या स्वातंत्र्याला यावर्षी 75 वर्ष (Independence Day) पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण ध्वजारोहण करताना जन-गण-मन हे आपलं राष्ट्रगीत आपण गातो. 'राष्ट्रगीत' हा कोणत्याही देशाचा वारसा असतो, ज्याच्याशी त्या राष्ट्राची ओळख जोडलेली असते. प्रत्येक राष्ट्राचे राष्ट्रगीत देशभक्तीची भावना व्यक्त करते. स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आम्ही तुम्हाला आपल्या भारताच्या 'राष्ट्रगीता'बद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात.
राष्ट्रगीताविषयी काही रंजक गोष्टी :
1. 'जन-गण-मन' हे भारताचे राष्ट्रगीत आहे. हे राष्ट्रगीत मूळ बंगाली भाषेत नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांनी ते रचले होते. टागोरांनी बांगलादेशचे राष्ट्रगीतही 'भारतो भाग्यो बिधाता' या नावाने रचले होते. याची शैली साधू बंगाली किंवा तत्सम बंगालीमध्ये असून यावर संस्कृतचा प्रभाव आहे.
2. भारतो भाग्यो बिधाता या रचनेचा पहिला श्लोक भारतीय संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला.
3. विशेष म्हणजे कोणत्याही देशाचे राष्ट्रगीत हे त्या देशाची ओळख जगासमोर मांडते. या राष्ट्रगीताने नागरिकांमध्ये एकतेची भावना दिसून येते.
4. राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला अंदाजे 52 सेकंदांचा वेळ लागतो. 54 सेकंद नाहीत.
5. 16 डिसेंबर 1911 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान पहिले सादरीकरण करण्यात आले. 'जन गण मन' हे प्रथमच हॅम्बर्ग येथे 11 सप्टेंबर 1942 रोजी सादर करण्यात आले.
6. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने राष्ट्रगीताची हिंदी आवृत्ती स्वीकारली. त्यानंतर त्याला अधिकृतपणे राष्ट्रगीत घोषित करण्यात आले. हे गाणे राष्ट्राची व्याख्या सर्व प्रांत, भाषा आणि धर्म यांचे संघटन म्हणून करते.
7. राष्ट्रगीत हे मूळतः बंगाली भाषेत लिहिलेले असले तरी सिंधचेही नाव होते. पण नंतर त्यात सुधारणा करून सिंधऐवजी सिंधू करण्यात आली, कारण देशाच्या फाळणीनंतर सिंध हा पाकिस्तानचा भाग बनला होता.
8. लोकांना राष्ट्रगीत गाण्याची सक्ती करणारी कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही. एखाद्या व्यक्तीने केवळ आदरपूर्वक शांतपणे उभे राहणे पसंत केले तर तो राष्ट्राचा किंवा राष्ट्रगीताचा अनादर मानला जात नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Happy Independence Day 2022 : 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 'या' सुंदर रांगोळी काढून उत्सव साजरा करा
- Independence Day 2022 : 75 व्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा देण्यासाठी 'असे' डाऊनलोड आणि शेअर करा WhatsApp स्टिकर्स
- Independence Day Monuments: देशातील 5 ऐतिहासिक स्मारक, ज्यांचा भारताच्या स्वातंत्र्याशी आहे संबंध