Happy Independence Day 2022 Wishes : 15 ऑगस्ट 2022 रोजी, संपूर्ण देश स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन (Happy Independence Day 2022) साजरा करण्यासाठी सज्ज आहे. या दिवशी भारतातील प्रत्येक घराघरात तिरंगा फडकविला जाणार आहे. आजकाल शुभेच्छा देण्यासाठी सगळेच सोशल मीडियाचा वापर करतात. अशातच तुम्हाला सुद्धा तुमच्या मित्र मंडळींना, नातेवाईकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त खास शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. चला तर जाणून घेऊयात. 


1. स्वातंत्र्य वीरांना करूया शत् शत् प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान...


स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


 


2. गंगा-यमुना आहे नर्मदा इथे,


मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,


शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो


आमचा भारत देश देता सदा सर्वदा...


स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


 


3. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे


आज हा दिवस पाहिला. ती आई आहे


भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या


वीरांमुळे हा देश अखंड राहिला...


स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


 


4. "ना जगावे धर्माच्या नावावर ना मरावे धर्माच्या नावावर, माणुसकीच धर्म आहे मातीचा, बस जगा भारत भूमीच्या नावावर."


 


5. "तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!"


महत्वाच्या बातम्या :