Rakesh Jhunjhunwala Passes Away: भारतातील दिग्गज उद्योगपती आणि शेअर बाजाराचा 'बिग बुल' म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं आज निधन झालंय. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँन्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) अखेरचा श्वास घेतला. आज (14 ऑगस्ट 2022) सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.  राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्युनंतर संपूर्ण देशभरात शोककळा परसली आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्यासह अनेक दिग्गाजांनी राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धांजली वाहली आहे. 


राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती.  राकेश झुनझुनवाला यांनी सुरुवातीला 100 डॉलर्सची गुंतवणूक केली होती. त्यावेळी सेन्सेक्स निर्देशांक 150 अंकांवर होता, जो आता 60 हजारांवर पोहचलाय. त्यांना भारतीय शेअर बाजाराचे वॉरन बफेट असंही संबोधलं जात असे.


नरेंद्र मोदी यांचं ट्वीट-


अमित शाह यांचं ट्वीट- 


राजनाथ सिंह यांचं ट्वीट-


जेपी नड्डा यांचं ट्वीट-


योगी आदित्यनाथ यांचं ट्वीट-


राकेश झुनझुनवाला हे सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबत एक यशस्वी उद्योजक-व्यावसायिक होते. झुनझुनवाला हे अॅपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष होते. प्राइम फोकस लिमिटेड, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, बिलकेअर लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोव्होग इंडिया लिमिटेड, कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड, इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज लिमिटेड, मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, विकाअर हॉटेल्स लिमिटेड आदी कंपन्याच्या संचालक मंडळावर ते होते. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची टायटन कंपनीमध्ये 5.5 टक्के भागीदारी होती.  झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये 26 जुलै 2022 मध्ये टायटनचे एकूण मूल्य अंदाजे 10 हजार 300 कोटींच्या आसपास होते. 'स्टार हेल्थ'मध्ये त्यांची 14.39 टक्के भागिदारी होती. 


हे देखील वाचा-