Independence Day 2021 Live : पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा- मुख्यमंत्री
Independence Day 2021 Live : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दरवर्षी पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन काय संबोधन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं.
LIVE
Background
Independence Day 2021 Live : देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्रासहित इतर 32 खेळाडूंना विशेष आमंत्रित करण्यात आलं आहे. आजच्या लाल किल्ल्यावरील या कार्यक्रमावर भारतीय वायुदलाच्या वतीनं पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. Independence Day 2021 Live : देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. या कार्यक्रमाचा सोहळा आज विशष पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर सकाळी 7.18 मिनीटांनी ते लाल किल्ल्याच्या लाहोरी गेट वर पोहोचतील. लाल किल्ल्यावरील या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनलर बिपिन रावत, संरक्षण सचिव अजय कुमार आणि लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख उपस्थित असतील.
त्यानंतर पंतप्रधानांना लष्कराच्या तीनही दलांकडून मानवंदना देण्यात येणार आहे. या दरम्यान, दिल्ली पोलिसांची एक तुकडीही या कार्यक्रमात उपस्थित असणार आहे. या मानवंदनेनंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावर पोहोचतील आणि तिरंगा फडकावतील. यावेळी राष्ट्रगीताची धुन वाजवण्याची जबाबदारी इंटर-सर्व्हिस ब्रॅन्डकडे असेल.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी लष्कराकडून 21 तोफेंची सलामी देण्यात येणार आहे. त्यानंतर लष्कराच्या वेगवेगळ्या तुकड्या आणि दिल्ली पोलिसांच्या तुकडीच्या वतीनं मानवंदना देण्यात येणार आहे. यावेळी भारतीय वायुदलाच्या वतीनं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
सुरक्षेचे कडक उपाय
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशामध्ये सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुन भारतीय पंतप्रधानांचे करण्यात येणारे संबोधन लक्षात घेता सुरक्षेचा उपाय म्हणून लाल किल्ल्याच्या आजूबाजूला शिपिंग कंटेनरच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. या कंटेनरच्या इमारतींच्या माध्यमातून 'राष्ट्र प्रथम-सदैव प्रथम' हा संदेश देण्यात येणार असून देशाच्या सांस्कृतीक, वैज्ञानिक आणि राष्ट्राशी संबंधित इतर पेंटिंगही त्यावर दिसून येणार आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तवर उभारण्यात येणाऱ्या या कंटेनरच्या इमारतींवर महात्मा गांधी, सरदार पटेल, भगत सिंह आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमा दिसणार आहेत. या कंटेनरच्या दुसऱ्या बाजूला तिरंग्याची प्रतिमा रंगवण्यात येणार आहे.
अकोल्यात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण
अकोल्यात आज पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडलंय. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहनाचा हा कार्यक्रम पार पडलाय. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होतेय. यावेळी पालकमंत्र्यांना जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सलामी देण्यात आलीय. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आलेय. कोरोना काळात उत्कृष्ठ सेवा केलेल्यांचा सत्कार यावेळी बच्चू कडू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय.
स्वातंत्र्य दिनानिमित्त साकारली राष्ट्रीय एकात्मता विषयावरील भव्य रांगोळी
भारतीय स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद शहरातील कलायोगी आर्ट्स च्या वतीने राष्ट्रीय एकात्मता विषयावरील 88 स्क्वेअर फुट आकारातील भव्य दिव्य रांगोळी साकारून रांगोळीच्या माध्यमातून सर्व भारतीयांना एका आगळ्या वेगळ्या प्रकारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत ही रांगोळी तीन तासाच्या कालावधीत पंधरा किलो रंगीत रांगोळी चा वापर करत पूर्ण करण्यात आली. ह्या रांगोळीसाठी कलायोगी आर्ट्सचे संचालक राजकुमार कुंभार विद्यार्थी जय पंडित, उषा वडतीले यांनी परिश्रम घेतले,
रांगोळी मध्ये भारत देशाचे भविष्य असलेला एक लहान मुलगा हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रकाशाच्या दिशेने भारताच्या प्रगतीचे एकेक पाऊल टाकत पुढे चालत आहे. हा मुलगा दुसरा कोणी नसून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे असे रांगोळीतून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे. ही रांगोळी स्वतंत्र भारताचे संविधान समाजवादी धर्मनिरपेक्ष सार्वभौम राष्ट्र असलेल्या भारताची ओळख दाखवणारी कलाकृती आहे, असं कुंभार यांनी म्हटलंय
नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न
भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त आज 15 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9 वाजता राष्ट्रध्वज वंदन करून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला
पालघरमध्ये ध्वजारोहण संपन्न
देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन सोहळा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जळगाव येथील एका शेतकऱ्याने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न
जळगाव येथील एका शेतकऱ्याने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न