एक्स्प्लोर
बांधकामामुळे नाखुश यशोधरा राजे-शिंदेंचा उद्घाटनास नकार

भोपाळ : एखाद्या वास्तूच्या उद्घाटनाला आल्यानंतर त्याचा दर्जा न आवडल्यामुळे मंत्री उद्घाटन न करताच परत गेल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे? मध्यप्रदेशातील मंत्री यशोधरा राजे शिंदे यांनी मात्र नापसंती दर्शवत उद्घाटनास नकार दिल्याचं समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील उद्योगमंत्री यशोधरा राजे शिंदे यांना एका आयटीआय कॉलेजच्या हॉस्टेलच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्या बांधकामाचा दर्जा न आवडल्यामुळे यशोधरा यांनी उद्घाटन न करताच परतणं पसंत केलं.
जोपर्यंत हॉस्टेल किमान सुविधांनी सुसज्ज केले जात नाही, तोपर्यंत याचं उद्घाटन स्थगित करण्यात आलं आहे, अशी घोषणा त्यांनी केली. यशोधरा यांच्या आकस्मिक भूमिकेमुळे हॉस्टेलचे बांधकाम करणारा कंत्राटदारही अवाक झाला. नामुष्की टाळण्यासाठी त्याने थेट मंत्रीमहोदयांचेच पाय धरले.
जोपर्यंत हॉस्टेल किमान सुविधांनी सुसज्ज केले जात नाही, तोपर्यंत याचं उद्घाटन स्थगित करण्यात आलं आहे, अशी घोषणा त्यांनी केली. यशोधरा यांच्या आकस्मिक भूमिकेमुळे हॉस्टेलचे बांधकाम करणारा कंत्राटदारही अवाक झाला. नामुष्की टाळण्यासाठी त्याने थेट मंत्रीमहोदयांचेच पाय धरले. Before You Go
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल





















