हरिद्वार : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रऋषी आहेत, अशा शब्दात योगगुरु बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. तर अशा सन्मानांमुळं जबाबदाऱ्यांमध्ये आणखी वाढ होत असल्याचं मोदींनी म्हटलं.


केदारनाथ मंदिराला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरिद्वार येथील पतंजली संशोधन संस्थेचे उद्घाटन केलं. याप्रसंगी मोदींच्या सत्कारार्थ केलेल्या भाषणात बाबा रामदेव यांनी मोदींची तोंडभरुन स्तुती केली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करत स्वच्छता राखण्याचं आवाहन केलं. मी अस्वच्छता करणार नाही, असा संकल्प देशवासियांनी करण्याची आवश्यकता असल्याचं मोदी म्हणाले.