मेरठ : उत्तर प्रदेश आणि सीएम योगी (Uttar Pradesh BJP) असे समीकरण झाले असल्याने इतर पक्षांतील नेत्यांची काय कार्यकर्त्यांचे सुद्धा धाडस होत नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून एक फलक चांगलाच व्हायरल होत आहे. तो इतका व्हायरल झाला, की समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विट करून योगी सरकारला उपरोधिक टोला दिला. 


हा प्रसंग उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh BJP) मेरठ शहरातील मेडिकल पोलीस स्टेशनच्या प्रांगणात घडला. मेरठमध्ये शुक्रवारी दुकानाच्या वादामध्ये मेडिकलप पोलीस स्टेशनमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी चांगलाच हंगामा केला होता. तसेच पोलिसांविरोधात नारेबाजी केली होती. हा तमाशा जवळपास चार ते पाच तास सुरु होता.


हा तमाशा सुरु असतानाच एक बॅनर त्या ठिकाणी झळकला. त्यावर लिहिले होते की, 'पोलीस स्टेशनमध्ये भाजप कार्यकर्त्यांना येण्यास बंदी' तसेच त्या बॅनरवर पोलीस ठाणे अंमलदाराचे नाव लिहिले होते. या प्रकरणात आता वादग्रस्त फलक लावणाऱ्या 6 जणांना पोलीसांनी उचलले आहे. मेरठचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, आरोपींची ओळख पटली आहे शंभू पहलवा, सागर पोसवाल, कुलदीप मसुरी, अंकूर चौधरी, अमित भडाना आणि अमर शर्मा अशी आरोपींची नावे आहेत. 


पोलीस स्टेशनच्या संरक्षक भिंतीवर लावलेल्या तो बॅनर सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला. अखिलेश यादव (akhilesh yadav) यांनी तो फोटो ट्विट करताच या प्रकरणाला आणखी धार मिळाली. त्यांनी ट्विट करत लिहिले की, गेल्या पाच ते सहा वर्षांत असं पहिल्यांदाच घडत आहे जेव्हा सत्तारुढ लोकांना लीस स्टेशनमध्ये येण्यास बंदी घातली आहे. हाच आहे उत्तर प्रदेशातील भाजप सरकारचा बुलंद इक्बाल.






पोलीस ठाणे अंमलदार संतशरण सिंह यांनी शनिवारी सांगितले की, व्हिडिओ फुटेजच्या आधारावर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत का ? असे विचारले त्यांनी ते समाजकंटक होते. ज्यांनी भाजप आणि मला बदनाम करण्यासाठी वादग्रस्त बॅनर लावला होता. दुसरीकडे महानगर भाजप अध्यक्ष मुकेश सिंधन यांनी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ते सर्व भाजपचे कार्यकर्ते आहेत.