Ram Mandir : श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिराच्या बांधकामाबाबत मोठे वक्तव्य केलं आहे. त्यांनी राम मंदिराबाबतही मोठा खुलासा केला आहे. पहिल्याच पावसात छतातून गळती लागली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिराच्या उभारणीच्या कामावर बोलताना सांगितले की, जुलै 2025 पर्यंत काम पूर्ण होणे अशक्य आहे, पण तसे बोलले जात असेल तर ते मला मान्य आहे. राम मंदिराच्या बांधकामावरही प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, राम लल्ला गाभाऱ्यात आहेत, तिथे पहिल्याच पावसात पाणी गळण्यास सुरुवात झाली आहे, त्याची चौकशी व्हायला हवी.



राम मंदिराचे काम 2025 पर्यंत पूर्ण होईल का?


राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिराबाबत मोठा खुलासा करत म्हटले की, हे 2024 आहे आणि एक वर्षानंतर 2025 आहे, एका वर्षात मंदिराचे बांधकाम पूर्ण होणे अशक्य आहे. पुढे ते म्हणाले की, ज्या ठिकाणी राम लल्ला आहेत ते पहिल्याच पावसात भिजायला लागले आहे आणि इतर ठिकाणीही पाणी गळू लागलं आहे. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


एका वर्षात मंदिर बांधणे अशक्य


राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, जे राम मंदिर बांधण्यात आले आहे, त्यातून पाणी बाहेर येण्याचा कोणताही मार्ग नाही, त्यामध्ये पाणी गळू लागलं आहे. ही समस्या खूप मोठी आहे, ही समस्या आधी सोडवली पाहिजे, असे ते म्हणाले. मंदिराच्या बांधकामाबाबत ते म्हणाले की, मंदिराचे संपूर्ण बांधकाम 2025 मध्ये पूर्ण होईल असे सांगितले जात असेल तर ती चांगली गोष्ट आहे, परंतु ते अशक्य आहे कारण अजून बरेच काही बांधायचे बाकी आहे.


पहिल्या पावसात गळती लागली


22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेकचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि आता पहिल्याच पावसात छतावरून पाणी गळू लागल्याचे राम मंदिराचे मुख्य पुजारी सांगत आहेत. 


एकाच पावसात रस्त्यांची सुद्धा दाणादाण 


दरम्यान, शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. पुष्पराज चौक ते फतेहगंज हा रस्ता पोलीस लाईन गेटसमोरील मोठ्या सर्कलमध्ये खचला. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या भोवती विटा टाकून, रस्त्याच्या खड्ड्यात झाडांच्या फांद्या टाकून सुरक्षा कठडा तयार केला. तसेच चौक घंटाघरजवळील रिकबगंज रस्ताही खचला. रस्ता खचला त्यावेळी एक कार तिथून जात होती. रस्त्यावरील खड्ड्यात कार अडकली. दुसरीकडे, रामपथलाही पाऊस सहन झाला नाही. या मार्गावर मुकुट कॉम्प्लेक्ससमोर, जिल्हा रुग्णालयाजवळ आणि रिकबगंज चौकात रस्ता खचला. याआधीही रामपथमध्ये अनेक ठिकाणी पावसाशिवाय खड्डे पडले आहेत. अशा स्थितीत त्याच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पावसामुळे ती बुडाल्याचे प्रकरण समोर आले आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ध्रुव अग्रवाल सांगतात की, काही ठिकाणी रस्त्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या