Cheapest Finger Print Lock For Homes : अनेक वेळा आपण लॉक तर करतो पण त्याची चावी कुठे हरवली हे आपल्याला कळत नाही. अशा परिस्थितीत कुलुप तोडण्याशिवाय पर्याय राहत नाही. पण आता ही कटकट संपणार आहे. घराची सुरक्षितता आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन आता फिंगरप्रिंट बायोमेट्रिक पॅडलॉक (Keyless Lock) बाजारात उपलब्ध आहेत. ही लॉक सिस्टीम तुमच्या फिंगरप्रिंटने लॉक उघडते. त्यामुळे कुलुपाच्या चाव्या ठेवण्याच्या त्रासातून तुमची सुटका होणार आहे. 


Arcnics Rugged स्मार्ट फिंगर प्रिंट पॅडलॉक


हे फिंगर प्रिंट पॅडलॉक 10 फिंगरप्रिंट सपोर्ट करते. म्हणजे तुमच्या घरातील 10 सदस्य त्यांच्या बोटांचे ठसे जोडू शकतात. याचा फायदा असा होईल की लॉक अनलॉक करताना एक सदस्य उपलब्ध नसेल तर दुसरा सदस्य ते सहज उघडू शकेल. या लॉकची किंमत सामान्य लॉकपेक्षा थोडी जास्त असेल. 


किमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची मूळ किंमत 6,999 रुपये आहे. पण तुम्ही Amazon वरून फक्त 3,690 रुपयांना खरेदी करू शकता.


हेरलिच होम्स फिंगरप्रिंट पॅडलॉक (Herrlich Homes Fingerprint Padlock) 


हे फिंगर प्रिंट पॅडलॉक तुमचे काम सोपे करते. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे घर सुरक्षित ठेवू शकता आणि कुठेही आरामात प्रवास करू शकता. यात एकाच वेळी दोन लोकांच्या बोटांचे ठसे जोडता येतात. याव्यतिरिक्त ते USB केबलद्वारे चार्ज करू शकते. 


किमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची मूळ किंमत 3,299 रुपये आहे. पण तुम्ही Amazon वरून फक्त 1,549 रुपयांना खरेदी करू शकता.


Escozor Smart Heavyduty फिंगर प्रिंट पॅडलॉक


तुम्ही तुमच्या फोनवरून हे फिंगर प्रिंट पॅडलॉक देखील नियंत्रित करू शकता. यासाठी तुम्ही Google Play Store किंवा Apple App Store वरून ॲप डाउनलोड करू शकता आणि तुमच्या फोनवरून लॉक सिस्टम नियंत्रित करू शकता. 


किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, या लॉक पॅडची मूळ किंमत 9,500 रुपये आहे. तुम्ही Amazon वरून फक्त 6,990 रुपयांना खरेदी करू शकता.


ही बातमी वाचा: