Parliament Session 2024 : नवनिर्वाचित 18 व्या लोकसभेची औपचारिक सुरुवात आजपासून (24 जून) झाली. सर्वप्रथम उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. यावेळी काँग्रेसचे नेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी, फैजाबाद लोकसभा खासदार अवधेश प्रसाद आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि नवनिर्वाचित कन्नौजचे खासदार अखिलेश यादव विरोधी बाकावर प्रथम रांगेत बसले होते. 






फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा पराभव


लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. जिथं राम मंदिराची निर्मिती केली तिथंही भाजपचा दारुण पराभव झाला. फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. सपाचे अवधेश प्रसाद यांनी भाजपच्या लल्लू सिंह यांचा 50 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. अखिलेश आणि राहुल यांच्यासह अवधेश प्रसाद यांना मैदानात उतरवण्यामागे मोठी खेळी मानली जात आहे. उत्तर प्रदेशात ज्या मुद्यांवर भाजपकडून सर्वाधिक जोर देण्यात आला त्याला यूपीमध्ये जनतेनं नाकारला होता, असे अप्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न आहे.  






पंतप्रधानांनी पहिली शपथ घेतली


दरम्यान, 18 व्या लोकसभेच्या पहिल्या दिवशी सपाचे सर्व खासदार हातात संविधानाची प्रत घेऊन एकत्र संसदेत पोहोचले. त्यांच्यासोबत सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांचे स्वागत केले. लोकसभेच्या पहिल्या सत्राची पहिली बैठक सोमवारी सुरू झाली. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. 


प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांनी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात केली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी एनडीएमधील पक्षांच्या मदतीने सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतले आहेत. भाजपला बहुमत मिळाले नसल्याने नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू किंगमेकर ठरले आहेत. एनडीए मंत्रिमंडळाने 9 जून रोजी शपथ घेतली होती. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या