एक्स्प्लोर

भारतीय लष्कराच्या गौरवशाली अश्वदलात आता घोड्यांची जागा रणगाडे घेणार?

लष्करात घोड्यांच्या वापराची प्रथा बंद होण्याची शक्यता आहे. लष्कराचे वाढते खर्च कमी करणे आणि त्यांची युद्धशक्ती वाढवणे याबाबत नेमण्यात आलेल्या समितीनं यासंदर्भातली शिफारस आपल्या अहवालात केली आहे.

नवी दिल्ली : भारतीय लष्करात गौरवशाली परंपरा असलेल्या अश्वदलाबाबत लवकरच एक महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या दलात आता घोड्यांऐवजी टँकचा वापर केला जावा असा प्रस्ताव समोर आल्यानं लष्करात घोड्यांच्या वापराची प्रथा बंद होण्याची शक्यता आहे. लष्कराचे वाढते खर्च कमी करणे आणि त्यांची युद्धशक्ती वाढवणे याबाबत नेमण्यात आलेल्या समितीनं यासंदर्भातली शिफारस आपल्या अहवालात केली आहे. केवळ उत्सवी महत्व या युनिटला राहिलेलं आहे, त्यामुळे ते बंद करण्यात यावं असही या अहवालात म्हटलं आहे. पण या निर्णयाला लष्कराचे अनेक निवृत्त अधिकारी विरोध करतायत. ही गौरवशाली परंपरा बंद पडू नये अशी चिंता अनेकांच्या बोलण्यातून व्यक्त होतेय. 61 घोडदळ युनिटचं मुख्यालय जयपूर इथे आहे. जयपूर आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी या अश्वदलाची युनिट आहेत. लष्कराच्या गौरवशाली परंपरेचं प्रतीक म्हणून तर या घोडदळाकडे पाहिलं जातंच, पण क्रीडा क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आहे. एक पद्मश्री, 10 अर्जुन पुरस्कार विजेते, 11 एशियन गेम्स मेडल या अश्वदलानं दिली आहेत. शिवाय पोलो वर्ल्डकपमध्येही अनेकदा भारतानं अभिमानास्पद कामगिरी केली आहे. राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक परेडमध्येही या अश्वदलाचा सहभाग असतो. त्यामुळे ही अश्वदलाची परंपरा बंद करण्याच्या प्रस्तावावर नाराजीचा सूर उमटतोय. कालबाह्य होतंय म्हणून जर हे बंद करत असाल तर ते टँक या घोड्यांऐवजी दिले जातायत तेही आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कालबाह्यच होतायत असं निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी म्हटलं आहे. उलट घोड्यावरुन गस्त घालणं हे टँकवरुन गस्तीपेक्षा अधिक स्वस्त आणि सुलभ असल्याचा दावा त्यांनी केला. ऑपरेशन पराक्रममध्ये राजस्थानाच्या वाळवंटात या युनिटनं यशस्वी कामगिरी केली आहे असंही त्यांनी म्हटलं. ऑक्टोबर 1953 मध्ये जयपूरमध्ये लष्करातल्या या घोडदळाची स्थापना झाली होती. इतिहास आणि आधुनिकता यांना जोडणारा दुवा असल्यानं त्याचं जतन आवश्यक असल्याचं तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता याबाबत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्त्र म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

Embed widget