Night-time Luminosity in India : भारताचा यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी एक दिवस केवळ शिल्लक आहे. त्याआधी 2021-22 सालच्या इकोनॉमिक सर्व्हेचं सादरीकरण मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी केलं. यावेळी बजेटबाबतच्या माहितीसह भारताने मागील 10 वर्षांत केलेल्या विकासाबाबतही सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे यावेळी भारतात झालेल्या प्रगतशील बदलांचे सॅटलाईटच्या मदतीने घेतलेली चित्रंही सादर करण्यात आली. यात भारतात 2012 आणि 2021 या वर्षांत बदलणाऱ्या नाईट लाईफमुळे झालेली झगमगही थेट दिसून येत आहे. यामुळे भारताने या 10 वर्षांत केलेला विकास आणि बदललेली नाईट लाईफ थेट कळून येत आहे. या सादरीकरणातील उजळलेला भारत पाहण्याजोगा आहे.


नाईट लाईफसह भारतात झालेले आणखी प्रगतशील बदलही या सादरीकरणात दाखवले गेले आहेत. ज्यामध्ये भारतात पसरलेलं हायवेचं जाळं, व्यावसायिक बँकांची संख्या, विमानतळं इत्यांदीचे सॅटलाईट फोटोद्वारे माहिती देण्यात आली आहे. दरम्यान यंदाच्या बजेटकडून सामान्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यात भारताच्या विकासासाठी कोणते बदल आणि सुविधा मिळणार याची आतुरतेने नागरिक वाट पाहत आहेत. पण त्यापूर्वी मागील 10 वर्षांत भारतात किती प्रगती झाली? हे सांगण्याचा प्रयत्न या सादरीकरणातून करण्यात आला आहे.


भारतातील हायवेचं जाळ अधिक गडद


भारतात 2011 सालच्या तुलनेत 2021 साली हायवे अर्थात राष्ट्रीय महामार्गांची संख्या अधिक झाली आहे. सॅटलाईटच्या मदतीने मिळवलेल्या चित्राद्वारे हे साफ कळत आहे. (P.C. PIB)




विमानतळांची संख्याही वाढली


भारतात 2016 सालच्या तुलनेत 2021 साली अर्थात 5 वर्षांत विमानतळांची संख्या अधिक झाली आहे. सॅटलाईटच्या मदतीने मिळवलेल्या चित्राद्वारे ही संख्या आपण पाहू शकतो. (P.C. PIB)




महत्त्वाच्या इतर बातम्या : 




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha