Bengaluru : देशातील सर्वच क्षेत्रातील उच्च शिक्षण गरीबांपासून ते पार हप्ते भरून घाईला आलेल्या मध्यमवर्गीयांपर्यंत किती दुरापास्त होत चालले आहे याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. बंगळूरमध्ये इंजिनिअरिंगमधील मॅनेजमेंट कोट्यातून काॅम्प्युटर सायन्सच्या एका जागेचा दर तब्बल 64 लाखांच्या घरात गेला आहे. बंगळूर शहरातील RV College of Engineering (RVCE) मध्ये मॅनेटमेंट कोट्यातील Computer Science (CS) Engineering साठी तब्बल 64 लाख रुपये घेत असल्याचे वृत्त समोर आले आहे.  


इतर विषयांमध्येही लाखांची वाढ


RV कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (RVCE) आपल्या NRI आणि मॅनेजमेंट कोट्यातील CS जागा 64 लाख रुपयांना देऊ करत आहे. हे शुल्क यावर्षीच आकारले जात आहे असे नव्हे, तर गेल्यावर्षी सुद्धा लाखोंची उड्डाणे केली होती. आकारण्यात येणारी फी डिमांड ड्राफ्टद्वारे भरणे आवश्यक आहे आणि प्रवेश प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर आधारित आहे. मॅनेटमेंट कोट्यातील दर ऐकून डोळे पांढरे व्हायची वेळ आली असतानाच इतर विषयांमध्येही लाखांमध्येच वाढ करण्यात आली आहे. यामध्ये माहिती विज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटीचे शुल्केच गेल्यावर्षीच्या 46 लाख रुपयांवरून 50 लाखांवर पोहोचले आहे. 


पीईएस युनिव्हर्सिटीमध्ये, मॅनेजमेंट कोट्यातील कॉम्प्युटर सायन्सचे वार्षिक शुल्क 1 लाख रुपयांनी वाढून 11 लाख रुपयांवर पोहोचले आहे. एकूण अभ्यासक्रमाची फी आता 44 लाख रुपयांपर्यंत वाढणार आहे. त्याच कोट्यातील इलेक्ट्रॉनिक्सचे वार्षिक शुल्क 6-7 लाख रुपये आहे, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वेबसाईटवर सीएस आणि इंजिनीअरिंगसाठी व्यवस्थापन कोट्यातील वार्षिक शुल्क 10 लाख रुपये आहे. माहिती विज्ञान आणि अभियांत्रिकी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी (डेटा विज्ञान), संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी (इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि सायबर सुरक्षा, ब्लॉकचेन तंत्रज्ञानासह) 7.5 लाख रुपये प्रति वर्ष आहे. 


पालक पैसे मोजण्यास तयार 


पात्रता निकष भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र/संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्समध्ये PU/इयत्ता 12 वीमधील सरासरी 60 टक्के आहे. इतर अनेक महाविद्यालयांमध्ये समान विषयांचे वार्षिक शुल्क 2 लाख ते 4 लाख रुपये आहे. बंजारा अकादमीचे संस्थापक-संचालक अली ख्वाजा म्हणाले की, ही झुंडशाहीची मानसिकता आहे. लोकांना संगणक शास्त्रात पदवी मिळवण्याचे वेड आहे. पालकांना वाटते की मुलाचे भविष्य सीएस सीटसह सुरक्षित आहे आणि ते एवढी मोठी रक्कम द्यायला तयार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या