एक्स्प्लोर

आधार वैधता : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा तुमच्या-आमच्यावर काय परिणाम?

शाळेत प्रवेश घेण्यासाठी, मोबाईल सेवांसाठी आणि बँकेत खातं उघडण्यासाठी आधार गरजेचं नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. पण सरकारी योजनांसाठी आधार कार्ड गरजेचं असेल.

नवी दिल्ली | आधारच्या वैधतेवर सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने मोठा निर्णय दिला आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठामध्ये तीन न्यायमूर्तींनी बहुमताने आधार घटनात्मक असल्याचा निर्णय दिला. सोबतच काही अटीही घातल्या आहेत. बँकिंग आणि मोबाईल सेवांसाठी आधार अनिवार्य नसेल, असा महत्त्वपूर्ण निर्णयही सुप्रीम कोर्टाने निकाल वाचन करताना दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टिस डी. वाय. चंद्रचूड, जस्टिस ए. एम. खानविलकर, जस्टिस सिकरी, जस्टिस अशोक भूषण यांच्या घटनापीठाने यावर निर्णय दिला. 38 दिवस चाललेल्या या प्रकरणाच्या सुनावणीवर 10 मे रोजी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने आपला निर्णय राखीव ठेवला होता. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सर्वसामान्यांवर काय परिणाम? बँक अकाऊंट | बँकेत खातं उघडण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं होतं. पण आता बँकेत खातं उघडण्यासाठी दुसरं पर्यायी ओळखपत्रही ग्राह्य धरलं जाईल. खातं उघडण्यासाठी आधार अनिवार्य असल्यामुळे बँकांमध्येच आधार नोंदणी सुरु करण्यात आली होती. मोबाईल सेवा | नवीन सिम कनेक्शन घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचं नसेल. सध्या बायोमेट्रिक घेऊन नवीन सिम दिलं जात होतं. सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने सर्व सिम कार्ड आधारला लिंक करण्याचे आदेश दिले होते. पण आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर हा आदेश रद्द होईल. शिक्षण क्षेत्र | आधार कार्ड नसल्यामुळे कुणालाही योजनेपासून वंचित ठेवू नये, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. शिवाय यूजीसी, नीट, सीबीएसईकडून विविध परीक्षांसाठी आधार कार्ड अनिवार्य केलं जातंय, ते चुकीचं असल्याचं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं. पण आता शाळेत प्रवेश घेण्यासाठी, परीक्षांसाठी आधार अनिवार्य नसेल. मोबाईल वॉलेट | खाजगी कंपन्यांना (उदाहरणार्थ दूरसंचार कंपन्या) आधार डेटा देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे. त्यामुळे कोणतीही कंपनी आता तुमचा आधार डेटा घेऊ शकणार नाही. मोबाईल वॉलेटची ई-केवायसी करण्याची जी अनिवार्यता आहे, ती आता रद्द होईल. सरकारी योजना | सरकारी योजनांसाठी आधार कार्ड देणं गरजेचं असेल. सरकारी अनुदान | सरकारी योजनांप्रमाणेच अनुदानासाठीही आधार कार्ड अनिवार्य असेल. पण आधार नसल्यामुळे कुणीही वंचित राहू नये, असाही आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे एखाद्या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल, तर आधार नोंदणी करावी लागेल. पॅन कार्ड | आयटी रिटर्न भरण्यासाठी आणि पॅन कार्डला आधार लिंक करण्याची प्रोसेस योग्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता पॅन कार्डशी आधार लिंक करावंच लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Apps : 'केवळ पाहू नका, तर तक्रार करा! FSSAI चे ग्राहकांना आवाहन; असुरक्षित अन्न आणि अस्वच्छ किचन दिसताच थेट ॲपद्वारे करता येणार तक्रार
'केवळ पाहू नका, तर तक्रार करा! FSSAI चे ग्राहकांना आवाहन; असुरक्षित अन्न आणि अस्वच्छ किचन दिसताच थेट ॲपद्वारे करता येणार तक्रार
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Rahul Dravid Coach : ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
Beed News: आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
Bollywood Song Story: माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या 'या' गाण्याची क्रेझ कायम
माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या 'या' गाण्याची क्रेझ कायम
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीतील दुर्दैवी घटना
मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, 15 वारकरी जखमी
Embed widget