नवी दिल्ली : देशभरात हवामान बदलत आहे. त्यामुळे लोकांमध्ये ताप, सर्दी, फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत, लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेत आहेत, ज्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) एक अॅडव्हायझरी जारी केली आहे आणि अँटिबायोटिक्स (Antibiotics) टाळण्याचा सल्ला दिला आहे. खोकला, मळमळ, उलट्या, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी आणि जुलाबाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे आयएमएने म्हटले आहे. या संदर्भातील सविस्तर पत्रच आयएमएनं काढलं आहे. 


इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या नोटिसमध्ये लोकांना आणि वैद्यकीय व्यावसायिकांना म्हणजेच डॉक्टरांना आवाहन केलं की, हंगामी येणारा ताप, सर्दी आणि खोकला असलेल्या वाढत्या रुग्णांना प्रतिजैविकांचं (अँटिबायोटिक्स) डोस लिहून देणं टाळावं.






IMAनं पत्रात काय म्हटलं आहे?


खोकला, मळमळ, उलट्या, घसादुखी, ताप, अंगदुखी, जुलाब अशी लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. हा संसर्ग साधारणपणे पाच ते सात दिवस टिकतो. ताप तीन दिवसांनंतर निघून जातो, पण खोकला तीन आठवड्यांपर्यंत टिकू शकतो. NCDC कडून मिळालेल्या माहितीनुसार, बहुतेक केसेस H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरसची आहेत. इन्फ्लूएंझा आणि इतर विषाणूंमुळे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत सर्दी किंवा खोकला होणं सामान्य आहे. बहुतेकदा हे 50 वर्षांवरील आणि 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आढळते. लोकांना तापासोबत वरच्या श्वसनमार्गाचे संक्रमण होते. 


रुग्णांनी कशा प्रकारची औषधं द्यावीत?


रुग्णांना जर ताप, सर्दी आणि किरकोळ खोकला असेल तर रुग्णांना केवळ लक्षणात्मक उपचार द्या, प्रतिजैविक देण्याची गरज नाही असं IMA नं म्हटलं आहे. पण सध्या, लोक अ‍ॅझिथ्रोमायसिन आणि अमोक्सिक्लॅव्ह यांसारख्या अँटीबायोटिक्स घेणं सुरु करतात, तेही डोस बरे वाटू लागल्यावर थांबवतात. अर्थात हे थांबवणं आवश्यक आहे कारण यामुळे प्रतिजैविकांचा प्रतिकार होतो. 


अँटिबायोटिक्स देण्यापूर्वी काय तपासणं आवश्यक आहे? 


कोरोना काळाच्या दरम्यान अजिथ्रोमाइसिन आणि आयव्हरमेक्टिनचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचं आपण पाहिलं आहे आणि यामुळं देखील प्रतिकार होत आहे. अँटिबायोटिक्स लिहून देण्यापूर्वी संसर्ग जिवाणूजन्य आहे की नाही याचं निदान करणं आवश्यक आहे. यावर उपाय म्हणून संसर्ग रोखण्यासाठी गर्दीची ठिकाणे टाळा, हात आणि श्वसन स्वच्छतेचा सराव करा आणि लसीकरण करा असं IMA नं म्हटलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Russian Scientist Death : कोरोनाची लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञाला संपवलं, बेल्टने गळा आवळून घेतला जीव