बंगळुरु : कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटकात होत असलेली विधानसभा निवडणूक 2019 च्या लोकसभा निवडणुकीची क्वार्टर फायनल मानली जात आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात सहा दिवसात 21 सभा घेतल्या, तर भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या 27 सभा आणि रॅली झाल्या.
पंतप्रधान मोदी आणि भाजपसाठी दक्षिण भारतातील ही निवडणूक मोठी परीक्षा आहे. कर्नाटकात भाजप 2008 ते 2013 या काळात सत्तेत होती. दक्षिण भारतात पहिल्यांदाच कमळ फुलवणाऱ्या येडियुरप्पा यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनीही मैदानात उतरत जोरदार प्रचार केला.
भाजपने कर्नाटकात विजय मिळवल्यास 2019 चा मार्ग सुकर होईल. शिवाय या विजयासोबतच 21 राज्यांमध्ये भाजपप्रणित एनडीएचं सरकार असेल. भाजप जिंकल्यास पुन्हा एकदा यावर शिक्कामोर्तब होईल, की मोदी लाट कायम आहे.
कर्नाटकात पंतप्रधान मोदींनी सहा दिवसात 21 रॅली आणि सभा घेतल्या, तर पाच वेळा नमो अॅपवरुन कार्यकर्त्यांना संबोधित केलं. या अॅपच्या माध्यमातून 25 लाख लोकांसोबत संवाद साधला, असा भाजपचा दावा आहे. कर्नाटक निवडणुकीसाठी मोदींनी सहा दिवस दिले असले, तरी अमित शाह गेल्या सहा महिन्यांपासून कर्नाकटवर लक्ष ठेवून आहेत.
कर्नाटक जिंकल्यास 21 राज्यांवर एनडीएचा झेंडा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 May 2018 07:48 AM (IST)
कर्नाटकात होत असलेली विधानसभा निवडणूक 2019 च्या लोकसभा निवडणुकीची क्वार्टर फायनल मानली जात आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात सहा दिवसात 21 सभा घेतल्या, तर भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या 27 सभा आणि रॅली झाल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -