Idli Sambhar Ice Cream : आजकाल खाद्यपदार्थांवर लोक तऱ्हेतऱ्हेचे प्रयोग करत आहेत. कधीकाळी फक्त वॅनिला, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट फ्लेव्हरमध्ये मिळणारी आईस्क्रीम आता - गुलाबजाम, चाऊमीन, बिर्याणी आणि इडली-सांबर अशा विविध फ्लेव्हर्समध्ये मिळू लागली आहे. असं असलं तरी, हे असले प्रयोग कुणाच्याही पसंतीस उतरत नाहीयेत. खाद्यपदार्थांच्या बाबतीत होत असलेले असे प्रकार पाहून अनेकांचा राग अनावर होतो. आता अशातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओत इडली-सांबर आईस्क्रीम (Ice Cream) बनत असल्याचं दिसत आहे.
आईस्क्रीम रोल बनवण्यासाठी इडली, सांबर आणि चटणीचा वापर
हा अनोखा आईस्क्रीम रोल बनवण्यासाठी दुकानदाराने इडली, सांबर आणि चटणीचा वापर केला आहे. हा व्हिडिओ फूड व्लॉगर सुकृत जैनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती इडलीचे छोटे तुकडे करताना दिसतो. मग तो इडलीवर नारळाची चटणी, सांबर आणि काही आईस्क्रीम टाकतो.त्याने हे सर्व मिश्रण नीट बारीक करुन थंड प्लेटसारख्या मशिनवर चांगलं पसरवलं आहे.
यानंतर या आईस्क्रिमचे रोल बनवून ते एका प्लेटमध्ये सर्व्ह करण्यात आले आहेत. यानंतर अर्धी इडली आणि काही चटणी त्यावर ठेवून ही डिश सजवली गेली आहे.
व्हिडीओवर लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया
17 जानेवारीला हा व्हिडिओ शेअर केल्यापासून आतापर्यंत व्हिडीओला 15 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक लोक कमेंट करून व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सुकृत जैन यानेही या आईस्क्रिमवर भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, या डिशची चव खूप छान होती. एका युजरने म्हटलं की, ज्याने हा शोध लावला त्याला अटक झाली पाहिजे. दुसऱ्या एका व्यक्तीने देखील मजेशीर कमेंट केली आहे, तो म्हणतो, 'कोण म्हणतं की ब्रेकअपमुळे सर्वात जास्त त्रास होतो?' तिसऱ्या युजरने लिहिलं की, 'त्या इडलीला न्याय हवा आहे.' तर एकाने म्हटलं, हे पाहून साऊथ इंडियन लोक कोपऱ्यात बसून रडत आहेत.
हेही वाचा: