Ice cream: उन्हाळ्यात आईस्क्रीम (Ice Cream) खायला सगळ्यांनाच आवडते. सध्या उन्हाळा (Summer) सुरू असल्याने बाजारात विविध प्रकारचे आईस्क्रीम उपलब्ध आहेत. गुणवत्तेनुसार त्यांची किंमतही बदलते. काही आईस्क्रीम 5, 10 रुपयांना येतात, तर काही 500 किंवा 1000 रुपयांपर्यंत असतात. प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे आपल्या आवडीचे आईस्क्रीम खरेदी करतो आणि खातो. पण जगात असे एक आईस्क्रीम आहे, जे विकत घेण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी सर्वात श्रीमंत व्यक्तीही शंभर वेळा विचार करेल. कारण ते एकदा खाल्लं तर तुम्हाला लाखो रुपये पचवावे लागतील.


जगातील सर्वात महाग आईस्क्रीम


जर तुम्हाला सर्वात महागड्या आईस्क्रीमच्या किमतीबद्दल विचार करण्यास सांगितले तर तुम्ही 1 हजार, 2 हजार किंवा जास्तीत जास्त 10, 20 हजारापर्यंतच विचार करू शकाल. पण, जगातील सर्वात महागड्या आईस्क्रीमची किंमत तुमच्या विचारापेक्षा जास्त आहे. जपानची आईस्क्रीम बनवणारी कंपनी सिलाटोची ब्याकुया (Byakuya) नावाची प्रोटीनयुक्त आईस्क्रीम जगातील सर्वात महागडी आइस्क्रीम (World’s most expensive ice cream) आहे.


आईस्क्रीमने केला जागतिक विक्रम 


ऑडिटी सेंट्रल न्यूजनुसार, गेल्या महिन्यात म्हणजेच 25 एप्रिल रोजी या नवीन आईस्क्रीमने जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम बनण्याचा विक्रम केला आहे. या आईस्क्रीमचा बेस दुधापासून (Milk Base) बनवला जातो, जो मखमली असतो. त्यात दोन प्रकारचे चीज (Cheese) आणि अंड्यातील पिवळ बलक (Yellow Egg Bulk)देखील समाविष्ट आहे.


सोबत मिळतो विशेष चमचा


याशिवाय परमिगियानो चीज, व्हाईट ट्रफल ऑइल (White Truffle Oil) अशा अनेक गोष्टींचाही या आईस्क्रीम बनवताना समावेश होतो. हे आईस्क्रीम स्टायलिश ब्लॅक बॉक्समध्ये पॅक केले जाते. विशेष म्हणजे हाताने बनवलेला धातूचा चमचाही (Metal Spoon) यासोबत येतो. हे चमचे क्योटोच्या काही कारागिरांनी विशेष टेक्निक वापरून बनवले आहेत.


आईस्क्रीमची किंमत?


कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 130ml Byakuya आईस्क्रीमची किंमत 6700 डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनात ही रक्कम 5 लाखांपेक्षाही जास्त आहे. पूर्वी असे समजले जात होते की आईस्क्रीमसोबत चमचा देखील येतो, म्हणून आईस्क्रीम महाग असते, पण तसे नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने आइस्क्रीमची ही किंमत चमच्याचा हिशोब न करता दिली आहे. निर्माता कंपनीने असे सुचवले आहे की, व्हाईट वाइनसह (White Wine) हे आइस्क्रीम खाणे हा एक चांगला पर्याय आहे.


हेही वाचा:


Climate Change : ग्लोबल वॉर्मिंगमुळे 82 टक्के भारतीय चिंतेंत, अहवालातून झाले स्पष्ट


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI