ICMR Guidelines Diabetes : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (Indian Council of Medical Research) म्हणजेच आयसीएमआरकडून (ICMR) टाइप 1 (Type 1 Diabetes) मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines for Management) जारी करण्यात आली आहेत. आयसीएकआरनुसार मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्यास अधिक संभाव्य धोका असतो. यामुळे अशा रुग्णांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.


कोरोना संसर्ग झालेल्या बहुतेक रुग्णांमध्ये कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे (80 टक्के) दिसतात. यामध्ये श्वसन संसर्गामुळे ताप येणे, घसा खबखवणे, खोकला येणे ही लक्षणे आढळतात. तर मधुमेह असलेल्या काही लोकांना उच्च रक्तदाब यासह अधिक गंभीर लक्षणे जाणवतात. म्हणू मधुमेह असलेल्या रुग्णांना कोरोना झाल्यास त्यांची अतिरिक्त काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.


मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये सर्व प्रकारचे संक्रमण आणि संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना कोरोना झाल्यास हे गंभीर ठरू शकते. त्यामुळे अशा व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्यास अधिक काळजी घ्या. योग्य आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा, तुमची औषधे वेळेत घ्या. तसेच साखरेची पातळी नियमितपणे तपासा यामुळे संभाव्य धोका टाळता येईल.


देशातील कोरोना संसर्गात वाढ


कोरोना संसर्गात सातत्याने वाढ होत आहे. देशात गेल्या 24 तासांत 4 हजार 518 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मार्चनंतरची ही सर्वाधिक रुग्ण वाढ नोंदवण्यात आली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 25 हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात 25 हजार 782 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तसेच रविवारी दिवसभरात 2779 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. ही तीन महिन्यांतील एका आठवड्यामध्ये नोंद झालेली सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, कोरोना मृतांची संख्या कमी झाली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या