नवी दिल्ली : 'एनडीटीव्ही इंडिया' या वृत्तवाहिनीवर घालण्यात आलेली एक दिवसाची बंदी सरकारने तात्पुरती स्थगित केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 'एनडीटीव्ही इंडिया'वरील बंदी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. 'पीटीआय'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.


एक दिवसीय बंदीच्या विरोधात 'एनडीटीव्ही इंडिया' वाहिनीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 9 नोव्हेंबरला एक दिवस चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले होते.

जानेवारी महिन्यात झालेल्या पठाणकोट हल्ल्याचं अतिप्रमाणात कव्हरेज केल्याचा ठपका चॅनलवर ठेवण्यात आला आहे. अतिसंवेदनशील माहिती दाखवल्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका पोहचत असल्याचा दावा केंद्रानं केला.

माहिती आणि प्रसारण मंत्रायलाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, एनडीटीव्ही इंडियाला 9 नोव्हेंबरला दुपारी एकपासून 10 नोव्हेंबरला दुपारी एक वाजेपर्यंत आपलं प्रसारण बंद ठेवावं लागणार होतं.

सरकारच्या निर्णयाविरोधात 'एनडीटीव्ही'ची सुप्रीम कोर्टात धाव


'अशाप्रकारची माहिती सार्वजनिकरित्या जाहीर करणं हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं घातक आहे. तसंच त्यावेळी दहशतवाद्यांना सूचना देणारे या माहितीचा वापर करु शकत होते.' असं मत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीने नोंदवलं होतं.

एखाद्या न्यूज चॅनलवर अशा प्रकारची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ होती. एकीकडे या बंदीचं समर्थन केलं जात होतं, तर दुसरीकडे या निर्णयावर टीका केली जात होती.

संबंधित बातम्या :

‘एनडीटीव्ही’नंतर आणखी दोन चॅनलवर बंदीची कारवाई


पठाणकोट हल्ला: एका आघाडीच्या हिंदी चॅनलवर एका दिवसाची बंदी


बंदीबाबत एनडीटीव्हीचं स्पष्टीकरण जसंच्या तसं