नवी दिल्ली : सन 2016 मध्ये यूपीएससी परीक्षेत टॉप केल्यामुळे चर्चेत आलेले राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी जोडपं टीना डाबी आणि अतहर आमीर यांच्या घटस्फोटाच्या अर्जावर जयपूरच्या फॅमिली कोर्टाने अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केलं आहे. या दोघांनी आपल्याला घटस्फोट मिळावा यासाठी परस्पर संमतीने फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केला होता.
दिल्लीच्या टीना दाबी यांनी 2016 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला होता. तर जम्मू-काश्मीरचा रहिवासी असलेल्या अतहर आमीरने त्याच परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. या दोन्ही टॉपर्सना राजस्थान केडर मिळाले आणि 2018 साली त्यांनी लग्न केलं. केवळ दोन वर्षातच हे दोन तरुण आयएएस अधिकारी देशभरात चर्चेत आले होते.
आता पुन्हा अडीच वर्षांनंतर हे दोन्ही अधिकारी चर्चेत आले आहेत. गेल्या वर्षी, नोव्हेंबर 2020 मध्ये या दोघांनीही आपला संसार मोडायचं ठरवलं आणि परस्पर संमतीने जयपूरच्या फॅमेली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
टीना दाबी आणि अतहर आमीर हे दोघेही राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात नियुक्त होते तेव्हापासून त्यांच्यातील संबंधात दुरावा निर्माण होऊ लागला होती अशी माहिती मिळतेय. नागरी सेवेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या या दोन तरुण अधिकाऱ्यांमधील नातेसंबंधांमध्ये धुसफूस होत असल्याच्या बातम्या येत होत्या. जेव्हा राज्य सरकारने वेगवेगळ्या जिल्ह्यात या दाम्पत्याची बदली केली तेव्हा सर्वांना समजले की, यांच्या नात्यात मोठा दुरावा निर्माण झाला आहे. टीना आणि अतहर यांनी वर्ष 2018 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये लग्न केले होते. तेव्हा टीनाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर स्वत: ला काश्मिरी सून म्हणूनही ओळख करून दिली होती.
महत्वाच्या बातम्या :