IPCC Report 2021 :   पृथ्वीचे तापमान वाढल्याने कोणते दुष्परिणाम जाणवतील याबाबत संयुक्त राष्ट्राच्या इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजचा सहावा अहवाल 'क्लायमेट चेंज 2021 - दी फिजिकल सायन्स बेसिस' प्रसिद्ध करण्यात आला. पृथ्वीचे तापमान वाढल्याने  येणाऱ्या काळात समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. त्यामुळे या शतकाच्या अखेरीस देशातील किनारपट्टीलगतची 12 शहरे तीन फूट पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये   मुंबई, चेन्नई, कोची, विशाखपट्टणम या शहरांचा ,मावेश आहे. 

भारतातील 12 शहरात शतकाच्या शेवटी पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्याता आहे. यापूर्वी असे  बदल 100 वर्षात होत होते. मात्र आता 2050 नंतर हे बदल दर सहा ते नऊ वर्षांनी होणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे. तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील बर्फ वितळत आहे. त्यामुळे येत्या काळात समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने किनारपट्टीवरील शहरांना धोका असणार आहे.  गेल्या तीन हजार वर्षात झाली नसेल इतक्या वेगाने 1900 सालापासून जागतिक स्तरावर समु्द्राच्या पातळीत वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 

जागतिक पातळीवर समुद्राच्या जल पातळीचे 2100 सालापर्यंत 2 मीटरपर्यंत आणि 2150 सालापर्यंत 5 मीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पुढील शंभर ते हजारो वर्षांच समुद्राच्या जलपातळीत वाढ होत राहणार आहे.

'ही' 12 शहरे तीन फूट पाण्याखाली जाण्याची शक्यता 

  1. कांडला: 1.87 feet 
  2. ओखा: 1.96 feet
  3. भावनगर : 2.70 feet
  4. मुंबई: 1.90 feet
  5. मोरमोगाओ : 2.06 feet
  6. मँगलोर: 1.87 feet
  7. कोचिन: 2.32 feet
  8. पारदीप : 1.93 feet
  9. खिडीपूर : 0.49 feet
  10. विशाखापट्टणम: 1.77 feet
  11. चेन्नई : 1.87 feet
  12. तुतीकोरीन: 1.9 feet

भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील वातावरण बदलाच्या संदर्भाचे परीक्षण करणारा हा अहवाल आहे. मानवी कृत्यांमुळे पृथ्वीच्या वातावरणीय व्यवस्थेत कशाप्रकारे बदल होतात, हे सूचीत करणारा हा आहवाल आहे.   हवामान बदलाच्या या घोंघावणाऱ्या संकटाने खूप काही बदलणार आहे.  हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या संकटांचा धोका येत्या काळात अधिक वाढणार आहे. महाराष्ट्राला देखील तापमानवाढीचा फटका बसला असून पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे.

संबंधित बातम्या :

IPCC Report 2021 : जागतिक तापमान वाढीचा भारताला धोका, समुद्र पातळीत वाढ होऊन वारंवार पुराची शक्यता, IPCC च्या अहवालातून इशारा