मुंबई : आयएएस अधिकारी टीना दाबी सध्या चर्चेत आहेत. टीना आपल्या वयापेक्षा 13 वर्षांनी मोठे असलेले  IAS प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्न करणार आहे. यूपीएससी टॉपर झाल्यापासून टीना दाबीची देशभर चर्चा आहे. टीनाप्रमाणेच तिची धाकटी बहीण रिया दाबीही यूपीएससी टॉपर आहे. दिल्लीची रहिवासी 23 वर्षीय रिया दाबी हिने यूपीएससी परीक्षेत 15 वा क्रमांक मिळवला होता. 


रिया ही 2021 बॅचची आयएएस अधिकारी आहे. सोशल मीडियावर ती खूप अॅक्टिव्ह असते. रिया दाबी ही राजस्थान कॅडरची आयएएस आहे. तिची बहीण टीना आणि तिचा भावी पती प्रदीप गावंडे हे देखील राजस्थान केडरचे आहेत.


रियाला राजस्थान केडर मिळाल्यानंतर टीना दाबीने सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे अभिनंदन केलं होतं. टीना दाबीने इन्स्टाग्रामवर रियाचा फोटो शेअर करत लिहिलं की, "तुला घरी आलेलं पाहून खूप आनंद झाला, राजस्थान केडरमध्ये तुझं स्वागत आहे."






टीना दाबीने बहीण रियाने UPSC 2020 परीक्षेत 15 वा क्रमांक मिळवल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. "माझ्या धाकट्या बहिणीने माझा सन्मान वाढवला आहे, मला खूप आनंद आहे की रियाने UPSC मध्ये चांगले यश मिळवले आहे."






टीना दाबी 2016 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी UPSC परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला होता. जेव्हा टीनाने UPSC मध्ये अव्वल क्रमांक पटकावला होता तेव्हा रिया कॉलेजमध्ये होती. एका मुलाखतीत तिने म्हटलं होतं की, "माझ्या मोठ्या बहिणेने पहिल्याच प्रयत्नात टॉप केलं होतं. तेव्हाच मी देखील आयएएस अधिकारी बनण्याचं ठरवलं होतं."


टीनाप्रमाणेच रियानेही पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाली. रिया आणि टीना यांनी दिल्ली विद्यापीठातील लेडी श्री राम यांच्याकडून महाविद्यालयीन शिक्षण घेतले.


देशातील सुंदर आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये रियाचा देखील समावेश आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवर रियाच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे.


सध्या, टीना राजस्थान सरकारमध्ये सहसचिव अर्थ (कर) या पदावर कार्यरत आहेत. तर तिचे होणारे पती, प्रदीप गावंडे हे राजस्थान पुरातत्व आणि संग्रहालय विभागात संचालक आहेत.