Jammu Kashmir Encounter : जम्मू आणि काश्मीरमधील शोपियानमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. गुरुवारी संध्याकाळी उशिरा शोपियानच्या तुर्कवांगम भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यामध्ये एका दहशतवाद्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तसेच या भागात आणखी काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाली असून सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.


तुर्कवांगम परिसरात गुरुवारी काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलांनी तत्काळ कारवाई करत शोध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर सुरक्षा दलांना दहशतवादी लपलेले ठिकाण सापडले. त्यानंतर त्यांच्यात चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात अजूनही दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची बातमी आहे. सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.







सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला असून रहदारीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अनेक सुरक्षा दल शोध मोहीम राबवत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha