एक्स्प्लोर
Advertisement
कपाळावर टिळा, भस्म लावणाऱ्यांची मला भीती वाटते : काँग्रेस नेते सिद्धरामय्या
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य करुन मोठा वाद ओढवला आहे. कर्नाटकमधील बदामी या ठिकाणी आयोजित एका सभेत बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की, कुंकवाचा टिळा आणि भस्म लावणाऱ्या लोकांची मला खूप भीती वाटते.
बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य करुन मोठा वाद ओढवला आहे. कर्नाटकमधील बदामी या ठिकाणी आयोजित एका सभेत बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की, कुंकवाचा टिळा आणि भस्म लावणाऱ्या लोकांची मला खूप भीती वाटते. सिद्धरामय्या यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
कर्नाटकात मोठ्या प्रमाणात लिंगायतांचे वास्तव्य आहे. लिंगायत कपाळावर भस्म लावतात. तर अनेक हिंदू कपाळावर टिळा लावतात. त्यामुळे सिद्धरामय्या यांचं हे वक्तव्य हिंदूविरोधी आणि लिंगातांविरोधात असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान सिद्धरामय्या यांच्या या वक्तव्यानंतर तरुणांनी सोशल मीडियावर #SelfieWithTilak (सेल्फी विथ तिलक) ही मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेत बहुसंख्य लोक सहभागी झाले असून सर्वजण आपआपले कपाळावर टिळा, कुंकू, भस्म लावलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तर अनेकांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे कपाळावर टिळा, कुंकू लावलेले फोटो शेअर केले आहेत.
काही दिवसांपूर्वी सिद्धरामय्या यांनी एका महिलेशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे काही दिवस ते ट्रोल होत होते. आता त्यांच्या या नव्या बेताल वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा ट्रोल होऊ लागले आहेत.
Former Karnataka CM and Congress leader Siddaramaiah at an event, in Badami, Karnataka, yesterday: I am scared of people who put long tikas with kumkum or ash. pic.twitter.com/44GB2AEeNX
— ANI (@ANI) March 6, 2019
Direct attack on Chinese Gandhis. Is there a revolt within Congress? pic.twitter.com/eZY5oRcCTG
— In politis there is Losmon Rekha (@masakadzas) March 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement