एक्स्प्लोर
मला पंतप्रधानपदाचा लोभ नाही, गडकरींचं स्पष्टीकरण
मला कुवतीपेक्षा खूप जास्त मिळाले आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाचा कोणताही लोभ नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.

नवी दिल्ली : मला कुवतीपेक्षा खूप जास्त मिळाले आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाचा कोणताही लोभ नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गडकरींनी काही सभा आणि मुलाखतींमध्ये केलेली विधाने ही मोदींविरोधी असल्याचे बोलले जात आहे. यावर गडकरींनी आज स्पष्टीकरण दिले. आज एबीपी न्यूजच्या शिखर संमेलनामध्ये नितीन गडकरी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या सरकारविरोधी भासणाऱ्या विधानांवर स्पष्टीकरण दिले. गडकरी म्हणाले की, मला माझ्या कुवतीपेक्षा खूप जास्त मिळालं आहे. मला त्याच्यापेक्षा अधिक काही नको. मला पंतप्रधानपदाचा लोभ नाही. माझ्या विधानांचे गैरअर्थ काढून चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मी जे काही बोलतो, माधमं त्यापैकी थोडाफार भाग कापून प्रसिद्ध करतात. त्यातून गैरअर्थ काढले जातात. त्यामुळे मी माध्यमांवर आणि माध्यमांच्या प्रतिनिंधींवर नाराज आहे. मी जे विधानच केले नाही, ते माझ्या नावावर चालवण्यात आले. व्हिडीओ :
Before You Go
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल






















