सुरुवातीला हा व्हिडीओ खरा आहे की, नाही याबाबत बरीच चर्चा सुरु होती. पण आता रेल्वेकडूनच याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ खरा असल्याचं समोर आलं आहे. रेल्वे याप्रकरणी वेंडरला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
हा व्हिडीओ मागील वर्षी डिसेंबरमधील आहे. असं स्पष्टीकरण रेल्वेकडून देण्यात आलं आहे. ही घटना चेन्नई सेंट्रल-हैदराबाद चारमिनार एक्सप्रेसमधील असल्याचं समोर आलं आहे.
'याप्रकरणी वेंडिंग कंत्राटदार पी शिवप्रसाद याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.' अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी एम उमाशंकर यांनी दिली.