मुंबई : लोकशाहीमध्ये सर्व प्रौढ नागरिकांनी मतदान केले पाहिजे. मतदान करणे हे आपले नागरी कर्तव्य असले तरी पहिल्यांदाच मत देणार्या लोकांना याची खूप क्रेझ आहे. जर तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्यही 18 वर्षांचा झाला असेल तर त्याने प्रथम मतदार ओळखपत्र बनवून घ्यावे.
मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी आता कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. मतदार ओळखपत्र घरबसल्या ऑनलाईन देखील बनवले जाऊ शकते. मतदार ओळखपत्र कसं बनवायच, त्यासाठी काय काय गरजेचं आहे, कोणत्या वेबसाईटवर जायचं, या सर्वाविषयी जाणून घेऊयात.
ऑनलाईन मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी काय कराल?
- सर्व प्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) https://www.nvsp.in/ वर जा.
- 'नवीन मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करा' या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर स्क्रीनवर एक फॉर्म येईल, ज्यामध्ये आपल्याला आपले नाव, पत्ता, जन्मतारीख भरावी लागेल.
- ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. आपला पत्ता आणि जन्मतारीख या दस्तऐवजांमधूनच पुष्टी केली जाईल.
- सर्व स्टेप्स व्यवस्थित पूर्ण केल्यावर सबमिटवर क्लिक करा.
- यानंतर आपण जो ईमेल आयडी दिला असेल त्या आयडीवर तुमच्या मतदार ओळखपत्र लिंक सह एक मेल पाठवला जाईल.
- यानंतर आपण आपल्या मतदार ओळखपत्राची स्थिती सहजपणे पाहू शकता. एका महिन्यात आपल्याकडे आपले स्वतःचे मतदार ओळखपत्र मिळेल.
इतर संबंधित बातम्या
- Aadhar-Pan Linking: घरबसल्या पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करा अवघ्या काही मिनिटात, कसं?
- तुमच्या आधारकार्डवर कुणी सिमकार्ड घेतलंय का? असं चेक करा
- Adhaar Card Update : आधार कार्डवरचा फोटो आवडत नाही? सोप्या पद्धतीने फोटो बदलून टाका
- Door Step Service : एक फोन करा आणि घरीच मागवा पैसे! बँकेत अथवा ATM मध्ये जायची गरज नाही