मुंबई : आधार कार्ड हा एक सर्वात महत्वाचा ओळख पुरावा आहे. ज्यात कार्डधारकाचा डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक डेटा दोन्ही आहे. आधारकार्ड अपडेट करण्याचे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलद्वारे आणि दुसरा आधार नोंदणी केंद्रास भेट देऊन. बरेच लोक त्यांच्या आधारच्या फोटोबाबत समाधानी नाहीत. जर तुम्हीही तुमच्या आधार कार्डवरील फोटोबाबत नाराज असाल तर खालील प्रक्रियेद्वारे आपण आधारमध्ये फोटो बदलू किंवा अपडेट करू शकता. 


आधार कार्डमध्ये फोटो बदलण्याची किंवा अपडेट करण्याची प्रक्रिया


आधारचा तपशील अपडेट करण्यासाठी, जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊ शकता किंवा आधार कार्डमधील फोटो बदलण्यासाठी खाली दिलेल्या टप्प्याने अपडेट करु शकता. 



  • जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या किंवा आधार सेवा केंद्र वेबसाईटवर जा आणि फॉर्म डाऊनलोड करा.

  • तो संबंधित फॉर्म भरा.

  • कार्यकारी कार्यालयाला भरलेला फॉर्म सबमिट करा आणि बायोमेट्रिक तपशील द्या.

  • फॉर्म घेतल्यानंतर कार्यकारी एक्जिक्युटिव्ह आपला थेट फोटो घेतील.

  • तपशील अपडेट करण्यासाठी 25 रुपये + जीएसटी फी भरावी लागेल.

  • एक्जिक्युटिव्हने आधार तपशील अपडेट करण्यासाठी सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, आपल्याला एक URN असलेली पोचपावती मिळेल.

  • अपडेट स्टेस्ट ट्रॅक करण्यासाठी Update Request Number (URN) वापरला जाऊ शकतो


अपडेटेड आधार कार्ड डाउनलोड प्रक्रिया



  • एकदा आधारमधील फोटो बदलण्याच्या रिक्वेस्ट प्रोसेस नंतर कुणीही अपडेटेड आधार कार्ड सहजपणे डाऊनलोड करू शकते.

  • अपडेट केलेले आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला UIDAI पोर्टलवर जावे लागेल. 

  • नॉर्मल आधार कार्ड किंवा मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय निवडू शकता.

  • अपडेटनंतर, आपल्याला आधार अ‍ॅपमध्ये आपला आधार तपशील रीफ्रेश करावा लागेल.

  • आधार कार्ड अपडेट करण्यासाठी डिजीलॉकर अॅप देखील आवश्यक आहे.


आधार कार्ड अपडेटशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे



  • आधार कार्डमध्ये फोटो बदलण्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया नाही.

  • कोणत्याही प्रकारचा फोटा सबमिट करण्याची आवश्यकता नाही. एक्जिक्युटिव्ह वेबकॅम वापरुन तिथे फोटो काढेल. 

  • आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी किमान कालावधी 90 दिवसांचा आहे.

  • पोचपावती स्लीपमध्ये दिलेली यूआरएन वापरुन तुम्ही आधार अपडेट स्टेटस ऑनलाईन तपासू शकता

  • सेल्फ-सर्विस अपडेट पोर्टल (एसएसयूपी) च्या माध्यमातून आधार कार्डमध्ये फोटो बदलण्याची कोणतीही ऑनलाइन प्रक्रिया नाही.