मुंबई : एका आधार कार्डवरून 18 फोन कनेक्शन (सिम कार्ड) घेता येऊ शकतात. त्यामुळे एखाद्याला माहिती न होता त्याच्या आधार कार्डवर फोन नंबर घेतला जाण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत जर आपल्याला हे शोधायचे असेल की आपल्या आधार कार्डवरून दुसर्‍याने फोन नंबर घेतला आहे का? तर ते आपण सहज शोधू शकता. आधार कार्डवर किती फोन नंबर रजिस्टर आहेत हे कसे तपासायचे हे पाहुयात. 


एका आधार कार्डवरून किती सिमकार्ड घेता येतील?


TRAI अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानुसार, यापूर्वी एका आधारकार्डवर नऊ सिमकार्ड खरेदी करता येत होते. आता एका आधार कार्डवर 18 सिम कार्ड खरेदी करता येतात. बिजनेसमुळे ज्या लोकांना अधिक सिमकार्डची गरज असते,  त्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन नऊऐवजी ही संख्या 18 सिमपर्यंत वाढवण्यात आली आहे.


Adhaar Card Update : आधार कार्डवरचा फोटो आवडत नाही? सोप्या पद्धतीने फोटो बदलून टाका


आधार क्रमांकावर किती फोन नंबर रजिस्टर आहेत कसे शोधायचे?



  • आधार कार्डशी किती नंबर लिंक आहेत हे शोधण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा.

  • हे जाणून घेण्यासाठी, आधार वेबसाईट यूआयडीएआयला (UIDAI) भेट द्या.

  • यानंतर होम पेजवर Get Adhaar वर क्लिक करा.

  • त्यानंतर Download Adhaar वर क्लिक करा.

  • आता  तिथे View More पर्यायावर क्लिक करा.

  • येथे Adhaar Online Service वर जाऊन  Aadhaar Authentication History वर जा.

  • आता येथे Where can a resident chech/ Aadhaar Authentication History वर जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

  • येथे एक नवीन इंटरफेस ओपन होईल. आता आपला आधार नंबर येथे टाईप करा आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि ओटीपीवर क्लिक करा.

  • आता इथे Authentication Type वर All सिलेक्ट करा.

  • आता तुम्हाला तिथे कालावधी ठरवण्यासाठी तारीख भरावी लागेल.

  • आता येथे ओटीपी टाकून वेरिफाय ओटीपी वर क्लिक करा.

  • असे केल्यावर आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल.

  • येथून आपण आपल्या डिटेल्स मिळवू शकता.