Pushkar Singh Dhami Profile: आता पुष्करसिंग धामी उत्तराखंडचे पुढचे मुख्यमंत्री असतील. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देहरादून येथे झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. धामी हे राज्याचे 11 वे मुख्यमंत्री असतील.


पुष्करसिंग धामी कोण आहेत?
पुष्करसिंग धामी हे एक तरुण नेते असून सध्या ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. धामी यांचा जन्म पिथौरागडच्या टुंडी गावात झाला. उधमसिंह नगरच्या खतिमा विधानसभा मतदार संघातून धामी यावेळी दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत.


धामी भगतसिंग कोश्यारी यांचे अगदी जवळचे मानले जातात. पुष्करसिंग धामी हे आरएसएस पार्श्वभूमीचे नेते आहेत. राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी एबीव्हीपीमध्ये बरीच महत्त्वाची पदे भूषवली आहेत. धामी हे दोनदा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.


पुष्करसिंग धामी यांच्या नावाची घोषणा स्वत: माजी मुख्यमंत्री सीएम तीरथसिंग रावत यांनी केली. उत्तराखंड भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर पुष्करसिंग धामी म्हणाले, माझ्या पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला सेवा करण्याची संधी दिली आहे. आम्ही प्रत्येकाच्या सहकार्याने सार्वजनिक प्रश्नांवर कार्य करू.


मुख्यमंत्रिपद मिळाल्यावर ते म्हणाले की, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा या सर्वांचे आभार मानतो.” आगामी निवडणुकीत पक्ष जिंकेल का विचारल्यावर ते म्हणाले की, हे एक आव्हान असून ते मी स्वीकारतो


शुक्रवारी रात्री उशिरा तिरथसिंग रावत यांनी राज्यपालांना आपला राजीनामा सादर केला. यापूर्वी त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून राजीनामा देण्याचं सांगितलं होतं. घटनात्मक पेच निर्माण झाल्याने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले होते.