मुंबई : केरळ, तामिळनाडू, लक्षव्दीप आणि आता महाराष्ट्र, गुजरातमध्ये ‘ओखी’ वादळानं अक्षरश: थैमान घातलं आहे. पण या वादळाचं नाव ‘ओखी’ कसं पडलं आणि वादळांना नावं कशी दिली जातात हे देखील फारच रंजक आहे.


वादळाचे नाव 'ओखी' कसे पडले?

'ओखी' या बंगाली भाषेतील शब्दाचा अर्थ डोळा असा आहे. बांग्लादेशने या चक्रीवादळाला 'ओखी' हे नाव दिले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं ‘ओखी’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातील वादळांना उष्णकटिबंधीय वादळ म्हटले जाते.

२००० सालापासून वादळाला नाव देण्याची पद्धत सुरु झाली आहे. बदललेल्या जागेनुसार वादळाला नाव दिले जाते. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार, थायलंडने नावे ठरवली आहे.

प्रत्येक देशाने वादळासाठी प्रत्येकी ८, अशी ६४ नावे ठरवलेली आहेत. भारतानं अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू ही आठ नावं सुचवलेली आहेत.