पंतप्रधान मोदी गुजराचे मुख्यमंत्री असताना राज्यातील महागाईसंदर्भात काही प्रश्न विचारले होते. यात त्यांनी 2014 आणि 2017 मधील अकडेवारी एका ग्राफिक्सच्या माध्यमातून दिली होती.
या चार्टमधून राहुल गांधींनी भाजप सरकारच्या काळाता महागाई कशी वाढली ते सांगितलं होतं?
पण त्यांनी जी आकडेवारी दिली होती, ती चुकीची होती. आपली चूक लक्षात आल्यानंतर राहुल गांधींनी चूक सुधारत, जुनं ट्वीट डिलीट केलं आणि नवीन ट्वीट त्यांनी केलं.
या नव्या ट्वीटमध्ये महागाईची टक्केवारी न देता, त्यांनी वस्तूंच्या किंमतीत किती रुपयांनी वाढ झाली ते एका चार्टच्या माध्यमातून दाखवलं.
दरम्यान, गुजरात निवडणूकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मात्र, मोदींवर वार करताना राहुल गांधींच गणित चुकल्याची चर्चा आता रंगत आहे.