एक्स्प्लोर

नोटाबंदीच्या परिणामांची लाट ओसरली, महानगरांमधील घर खरेदीचं प्रमाण घटलं

नवी दिल्ली : गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्री मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर, संपूर्ण देशात मोठा गोंधळ उडाला. या निर्णयानंतर आर्थिक व्यवहारांवरही मोदी सरकारने निर्बंध आणले. त्यामुळे काळी कमाई रिचवलेल्या अनेकांचे धाबे दणाणले होते. अनेकांनी यातून मध्य मार्ग काढत रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे महानगरांमध्ये घरांच्या किमतीही कमालीच्या वाढल्या. पण नोटाबंदीचा परिणाम आता कमी झाला आहे. त्यामुळे नवीन घरखरेदीचं प्रमाणही घटलं आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील रिसर्च अॅन्ड अॅनालिटिक्स फर्म प्रोपईक्विटीने (RAFP) दिलेल्या माहितीनुसार, 2017 च्या पहिल्या तिमाहित घरांच्या विक्रीत एक ट्क्का घट झाली. तर नवे प्रकल्प उभारण्यामध्ये ही तफावत 19 टक्के होती. दुसरीकडे विक्री न झालेल्या घरांचं प्रमाण 3.12 टक्के इतकं होतं. नोटाबंदीनंतर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान नोएडा, गुरुग्राम, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरु, पुणे आणि चेन्नईमध्ये घर खरेदीचं प्रमाण जास्त होतं असं RAFP चं म्हणणं आहे.  RAFP च्या आकडेवारीनुसार, 2017 च्या पहिल्या तिमाहित देशातल्या महानगरांमध्ये 28,131 घरांची विक्री झाली. तर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानच्या तीन महिन्यात 28,472 घरांची विक्री झाली. म्हणजे नोटाबंदीनंतरच्या काळाच्या तुलनेत जानेवारीच्या पहिल्या तिमाहित नव्या घरांच्या विक्रीचं प्रमाण एक ट्क्क्यांनी घटलं होतं. तर नवे प्रकल्प उभारणीचं प्रमाणात मोठी घट झाल्याचं RAFP च्या रिपोर्टमधून समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, 2017 च्या पहिल्या तिमहित 22,897 नवे प्रकल्प सुरु झाले. तर नोटाबंदीच्या काळात तब्बल 28,428 नवे प्रकल्प सुरु झाले. म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत 2017 च्या पहिल्या तिमाहित नवे प्रकल्प सुरु होण्याच्या प्रमाणात 19.46 टक्क्यांनी घट झाली. दरम्यान, विक्री न झालेल्या घरांचं प्रमाण थोडं कमी होतं. रिपोर्टनुसार, डिसेंबर 2016 पर्यंत 4,84,043 घरांची विक्री झाली नव्हती. तर मार्च 2017 मध्ये या प्रमाणात घट होऊन 4,71,855 इतकं हे प्रमाण होतं. म्हणजे, घरांच्या विक्रीचं प्रमाण 3. 12 टक्के होतं. विकासकाकडूनही नवी घरं बांधण्याऐवजी बांधलेल्या घरांच्या विक्रीवरच सर्वाधिक भर होता. त्यामुळे नवे प्रकल्प उभारणीचं प्रमाण घटलं होतं, असा निष्कर्ष RAFP नं नोंदवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget